Summer Eye Care| Use Ultraviolet Sunglasses sakal
लाइफस्टाइल

Summer Eye Care: उन्हापासून घ्या डोळ्यांची काळजी; अल्ट्राव्हायोलेट चष्मा वापरण्याचा मिळतोय सल्ला

How To Care Of Eye During Summer: यंदाचा उन्‍हाळा ‘ताप’दायक असल्‍याचे जाणवत आहे. त्यामुळे चष्म्यांचा वापर करून डोळ्यांची काळजी घ्या आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करा.

सकाळ वृत्तसेवा

How To Protect Eyes From UV Rays In Summer: यंदाचा उन्‍हाळा ‘ताप’दायक असल्‍याचे जाणवत आहे. पुण्‍यात पारा चाळीशीच्‍या पार पोचल्‍याने उन्‍हाचे चटके त्‍वचेला बसतातच, त्‍याचबरोबर डोळ्यांनाही त्रास होतो. यामध्‍ये डोळे लाल होणे, कोरडे होणे, पाणी येणे ही लक्षणे वाढली असून डोळे येण्याचे व डोळ्यांच्या ॲलर्जी स्‍वरूपाच्या आजाराचे प्रमाणही वाढले असल्‍याचे निरीक्षण नेत्ररोगतज्‍ज्ञांनी नोंदवले आहे.

ससून रुग्‍णालयातील नेत्ररोग विभागाचे सहयोगी प्राध्‍यापक डॉ. सतीश शितोळे म्‍हणाले की, ‘‘सध्‍याच्‍या वातावरणात हवेतील आद्रता कमी होत असल्‍याने ॲलर्जी स्‍वरूपाचे आजार वाढले आहेत. त्‍यामध्‍ये डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे या प्रकारचे रुग्‍ण दिसून येत आहेत. खासकरून मुलांमध्‍ये याचे प्रमाण जास्‍त असल्याचे दिसत आहे. उन्‍हाबरोबरच धुळीचाही डोळ्यांना त्रास होतो. त्‍यासाठी बाहेर पडताना गॉगल वापरावा, टोपी घालावी. डोळ्यांचा काही त्रास होत असल्‍यास नेत्र तज्ज्ञांना भेटून उपचार घ्यावेत.’’

अशी घ्या काळजी

- उन्‍हात बाहेर पडताना टोपी घाला व डोळ्यांना गॉगल लावा

- चेहरा वारंवार थंड पाण्‍याने धुवा

- डोळ्यांची लाली वाढल्‍यास नेत्ररोगतज्‍ज्ञाला दाखवा

- डोळ्यांचा धुळीपासून बचाव करण्‍यासाठी हेल्‍मेट वापरा किंवा चांगला चष्‍मा वापरा

सध्‍या उष्‍णता खूप वाढली आहे. त्‍याचा परिणाम डोळ्यांवरही होत असून त्‍यामुळे डोळे येण्‍याचे प्रमाण (कंजेक्‍टीव्‍हायटिस) वाढले आहे. डोळे लाल होणे, पाणी येणे, ही त्‍याची लक्षणे दिसून येत आहेत. त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणजे अल्‍ट्राव्‍हायोलेट स्‍वरूपाचे चष्‍मे वापरावेत. वारंवार डोळ्यांना हात लावू नये. जर डोळ्यांतून घाण पाणी येणे, डोळे चिकटणे असे जाणवत असल्‍यास नेत्ररोगतज्ज्ञांकडे जाऊन वेळीच उपचार केला तर इतरांना संसर्ग होणे टाळता येते.

- डॉ. अनिल दुधभाते, नेत्ररोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT