Face Care  google
लाइफस्टाइल

Face Care : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरीच तयार करा द्राक्षाचे हे ५ फेसपॅक

त्यानंतर १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने पुसून टाका. यामुळे त्वचेवरील डाग आणि बारीक रेषा कमी होतील.

नमिता धुरी

मुंबई : चांगलं दिसण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फेस पॅक वापरतात. असे असूनही, त्वचेवर दीर्घकाळ टिकणारी चमक मिळवणे सोपे नसते. मात्र, जर तुम्हाला त्वचेवर भरपूर ग्लो आणायचा असेल तर द्राक्षाचा फेसपॅक वापरणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

पोषक तत्वांनी युक्त द्राक्षे हा आरोग्याचा खजिना मानला जातो. चला तर मग जाणून घेऊ या द्राक्षांचा फेस पॅक बनवण्याची पद्धत आणि त्याचे काही फायदे. हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण (face packs of grapes to enhance your face beauty)

डागांपासून मुक्ती : व्हिटॅमिन ए ने समृद्ध द्राक्षे त्वचेचे कोलेजन वाढवण्यास मदत करतात. ते तयार करण्यासाठी, एका टोमॅटोमध्ये ५-६ द्राक्षे मिसळा. आता ते चेहरा आणि मानेवर लावा.

त्यानंतर १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने पुसून टाका. यामुळे त्वचेवरील डाग आणि बारीक रेषा कमी होतील.

तेल संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त : द्राक्षांचा फेस पॅक लावून तुम्ही तेलकट त्वचेपासून मुक्त होऊ शकता. यामध्ये ८-९ काळी द्राक्षे मॅश करा. आता त्यात १ चमचा मुलतानी माती आणि १ चमचा गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावा. त्यानंतर १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

काळी वर्तुळे दूर होतील : डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही द्राक्षाचीही मदत घेऊ शकता. रोज झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली द्राक्षांचा लगदा लावा. त्याच द्राक्षाच्या बियांचे तेल लावून तुम्ही काळ्या वर्तुळांपासूनही मुक्ती मिळवू शकता.

कोरड्या त्वचेवर उपाय : द्राक्षांचा फेस पॅक त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी ४-५ द्राक्षे २-३ स्ट्रॉबेरीमध्ये मिसळा आणि मिश्रण करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा मुलायम दिसेल.

त्वचेवर चमक आणा : द्राक्षे आणि उसाच्या रसाचा फेस मास्क लावून त्वचेवर झटपट चमक आणू शकता. हे करण्यासाठी, २ चमचे द्राक्षाच्या लगद्यामध्ये १ चमचा कॅमोमाइल रस आणि १ चमचा उसाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. आता १०-१२ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT