लाइफस्टाइल

मुंबईजवळच करा ट्रिपचा प्लॅन; टिटवाळा-अंबरनाथमधील 'लो बजेट' रिसॉर्टला द्या भेट

शर्वरी जोशी

उन्हाळा हा ऋतू कितीही नकोसा वाटत असला तरीदेखील याच ऋतूमध्ये सर्वाधिक पिकनिकचे प्लॅन रंगत असतात. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपासूनच तरुणाई त्यांच्या पिकनिकचे प्लॅन आखू लागतात.  पिकनिक किंवा ट्रिप म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फिरायला जाण्याचं ठिकाण. अनेक जण महाराष्ट्राबाहेर किंवा विदेशात फिरायला जाण्याचा बेत आखतात. मात्र, कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी प्रत्येकालाच बजेटचा विचार करावा लागतो. यात कमी बजेटमध्ये  फिरता येईल अशा काही निवड ठिकाणांना पर्यटकांकडून जास्त पसंती देण्यात येते. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत जेथे गेल्यावर तुम्हाला विदेशात फिरल्याचा भास होईल. यामध्येच मुंबई आणि मुंबईजवळही अशी अनेक ठिकाणं आहेत जे तुमच्या खिशाला परवडू शकतात आणि सोबतच तुमची पिकनिकही  अविस्मरणीय करु शकतात. त्यामुळेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टिटवाळा, अंबरनाथ या गावांजवळ असलेले लो बजेटमधील रिसॉर्ट कोणते ते पाहुयात.

१.  Harmony Village Resort -

अनेकदा पर्यटकांचा प्रश्न असतो की टिटवाळा किंवा अंबरनाथमध्ये फिरण्यासारखं काय आहे? अशा पर्यटकांनी एकदा तरी Harmony Village Resort या रिसॉर्टला नक्की भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात जर शांतपणा अनुभवायचा असेल तर हे रिसॉर्ट बेस्ट ऑप्शन आहे. विशेष म्हणजे हे रिसॉट तेथील आदरातिथ्य आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी खासकरुन ओळखलं जातं. या रिसॉर्टमध्ये अनेक डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सोबतच नारळपोफळीची झाडंही आहेत.

ठिकाण - : Chon Gaon, राहटोली जंक्शन, बदलापूर

२. River Winds Resort-

कल्याण मुरबाड रोडजवळ असलेलं हे रिसॉर्ट वन डे पिकनिकसाठी उत्तम असल्याचं म्हटलं जातं. २.५ एकर जागेत विस्तारलेल्या या रिसॉर्टमध्ये अनेक सुखसोयींची व्यवस्था करण्यात आली असून येथे राहण्याचीदेखील व्यवस्था आहे.  विशेष म्हणजे येथे स्विमिंग पूलदेखील आहे. तसंच फॅमेली पिकनिकसाठी ही जागा उत्तम आहे. येथे पूल एरिया, बार, कॉन्फरन्स रूम, स्पा यांचीदेखील सोय आहे.

ठिकाण - मेरीडिअन स्कूलजवळ, कल्याण-मुरबाड रोड, कांबा

३.  Nisarg Garden Resort  -

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं ठिकाण म्हणजे निसर्ग गार्डन रिसॉर्ट. जर तुमचं बजेट कमी असेल तर हे  रिसॉर्ट एक चांगला ऑप्शन होऊन शकतं. येथे लहान मुलांसाठी स्विमिंग पूलची सोय करण्यात आली आहे. तसंच या रिसॉर्टला फॅमेली पिकनिकसाठी विशेष पसंती दिली जाते. येथे स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स,गार्डन, स्नॅक्स सेंटरची व्यवस्था आहे.

ठिकाण - मुंबई- नाशिक हायवे NH3, वासिंद पश्चिम, तालुका- शहापूर.

४.  Laura Resort -

विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर हिरवळ पाहायला मिळते. येथे जवळपास ३०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. या रिसॉर्टपर्यंत पोहोचण्यासाठी टिटवाळा हे स्थानक सोयीचं आहे.  मित्र परिवार तसंच कुटुंबियांसोबतदेखील तुम्ही येथे भेट देऊ शकता. येथे छोटेखानी प्राणीसंग्रहालय, मत्स्यालयदेखील आहे.

ठिकाण - गणपती मंदिराजवळ, रुंदा रोड, टिटवाळा

५.  Bhoj Resort -

टिटवाळा- अंबरनाथ येथील आणखी एक बेस्ट रिसॉर्ट म्हणजे Bhoj Resort. हा रिसॉर्ट खासकरुन येथील अॅम्बिअन्समुळे लोकप्रिय आहे.  निसर्ग जर जवळून पाहायचा असेल तर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. येथील सुर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी अनेक जण उत्साही असतात.

ठिकाण - कोंडेश्वर रोज, भोज डॅम, भोज गाव, बदलापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी

Nashik Municipal Election : सिडकोत निकालाचा थरार! भाजपचे दुबार एबी फॉर्म प्रकरण गाजले; ५ जणांची उमेदवारी फेटाळली

Car Launch in 2026 : एकच झलक, सबसे अलग! 2026 वर्षांत लॉंच होणार 10 ब्रॅंड कार; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स

SCROLL FOR NEXT