Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : या चुकांमुळे लग्न मोडतात, जया किशोरीने सांगितला आनंदी अन् सुखी नात्यांचा मंत्र

काही गोष्टींमुळे कितीही प्रयत्न करून लग्न टिकत नाही. आध्यात्मिक कथा वाचक जया किशोरीने याबाबत तिचे मत मांडले आहे

साक्षी राऊत

Relationship Tips : लग्नानंतर किंवा लग्नाआधीचे प्रेमसंबंध असो, ते टिकवण्यासाठी नात्यांवर मेहनत घ्यावी लागते. लग्न हे दोन व्यक्तींचं मिलन नसून दोन कुटुंबांच मिलन असतं. अशावेळी मुलींना नाते टिकवण्याचे आणि सहनशील राहाण्याचे सल्ले दिले जातात. मात्र काही गोष्टींमुळे कितीही प्रयत्न करून लग्न टिकत नाही. आध्यात्मिक कथा वाचक जया किशोरीने याबाबत तिचे मत मांडले आहे. नाते टिकवण्याबाबत तिचे काय मत आहे ते आज आपण जाणून घेऊया.

जया किशोरीच्या मते, जिथे नाते टिकवण्यासाठी तड जोड केली जाते किंवा त्याग केला जातो अशी नाती भविष्यात तुटतात. अनेक लोकांना तडजोड आणि त्याग यातील अंतर देखील कळत नाही आणि हळूहळू पार्टनरसोबत नको असलेलं नातं जड होत जातं. तेव्हा जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला अॅडजस्टमेंट आणि त्याग यातील फरक समजून घ्यावा लागेल असे ती सांगते.

लग्न तुटण्याचं कारण काय?

जया किशोरीच्या मते जेव्हा नात्यात तडजोडीऐवजी पार्टनरला एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो तेव्हा नात्यात दुरावा येतो. अशात जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर त्याचं मोठं कारण म्हणजे लहान लहान गोष्टींसाठी तुम्ही केलेला काँप्रोमाइज आहे. जेव्हा तुमच्या त्यागाचं मोल पार्टनरला नसते तेव्हा ते प्रेम निराशेत बदलतं आणि हळूहळू संपत जातं. (marriage)

नात्यातील तडजोड म्हणजे काय?

नात्यातील तडजोड म्हणजे एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे. यामध्ये अगदी लहान गोष्टींचा समावेश आहे ज्या करताना तुम्हाला चुकीचे किंवा अस्वस्थ वाटत नाही. उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर पण पार्टनरला आवडत असेल तर त्याच्यासाठी ती बनवणे व स्वत:ही खाणे. आपल्या पार्टनरशी जुळवू घेणे आणि त्याच्या आनंदात आनंदी होणे. हे उत्तम नात्यासाठी फार गरजेचे आहे. (Relationship Tips)

नात्यात काँप्रोमाइज तोट्याचा

नात्यात काँप्रोमाइज करताना तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध वागत असता. तसेच त्यातून तुम्हाला आनंदही मिळत नसतो. अशावेळी तुमच्या पार्टनरसोबत तुमचे झगडे होऊ शकतात. तसेच असे पार्टनर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णयही घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT