Fashion Tips ESAKAL
लाइफस्टाइल

Fashion Tips : व्यक्तिमत्त्वानुसार फॅशन हवी

मला अंधपणाने फॅशन ट्रेंड्स फॉलो करणे जमत नाही

सकाळ डिजिटल टीम

Fashion Tips : मला अंधपणाने फॅशन ट्रेंड्स फॉलो करणे जमत नाही, कुठलीही स्टाइल फॉलो करण्यापेक्षा मी स्वतःवर जे छान वाटतील, असे कपडे घालते. मला वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात. सोनी सब वाहिनीवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या मालिकेत दीप्ती या माझ्या व्यक्तिरेखेची स्टाईल स्टेटमेंटजी आहे, तशी काहीशी मी खऱ्या आयुष्यात देखील आहे.

दीप्ती ही वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल, प्रसंगांना अनुसरून कपडे परिधान करते. तिचं ऑफिसवेयरही खूप क्लासी आहे. मीदेखील माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात फॅशन करते. मी कुठलीही फॅशन फॉलो करताना माझ्या कम्फर्टला जास्त प्राधान्य देते. फॅशन ट्रेंड फॉलो करण्यासाठी अवघडून राहणं मला पटत नाही.

पारंपरिक पोशाख परिधान करताना, विशेषत: साडी नेसताना अनेक गोष्‍टींची काळजी घ्यावी लागते. साडी नेसताना मी एका गोष्टीची काळजी घेते ते म्हणजे आपण कुठल्या प्रसंगासाठी जातोय.

लग्न समारंभासारखा मोठा प्रसंग असेल, तर आपण साडीसोबत खूप दागिने घालू शकतो; पण छोट्या समारंभासाठी जात असू, तर मी ओव्हरड्रेस्ड नाही वाटणार याची काळजी घेते. साडीसोबत व्यवस्थित दागिने आणि छान मेकअप असेल, तर आपला लूक जास्त खुलून येतो.

माझा फॅशन फंडा आहे कम्फर्ट ओव्हर फॅशन. तुम्ही कम्फर्टेबल कपडे घातले, तर तुम्ही अजून कॉन्फिडन्ट आणि सुंदर दिसता. मला सगळे रंग आवडतात. ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्ती ही सगळ्या रंगांचे कपडे घालते आणि तशीच खऱ्या आयुष्यात मीदेखील सगळ्या रंगांसोबत एक्स्पिरिमेंट करते. माझ्या मते तरी भारतीय मुलींच्या स्किनटोनला सगळे रंग खुलून दिसतात, त्यामुळे आपण जितके रंगांशी खेळू तेवढे आपण फॅशनच्या जवळ आहोत असं मला वाटतं.

मला आलिया भट हिचा फॅशन सेन्स खूप आवडतो. ती खूप ग्रेसफुली सगळ्या प्रकारचे आऊटफिट कॅरी करते आणि ती तिच्या फॅशन सेन्सनं तरुण आणि आत्मविश्वासपूर्ण मुलींचं प्रतिनिधित्व करते, असं मला वाटतं.

फॅशन टिप्‍स

१) तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून कपडे परिधान करा आणि तुमची खरी ओळख जपून ठेवा. फॅशनसाठी जे तुम्ही नाहीत, ते बनू नका.

२) आत्मविश्वास ठेवा. कारण तुम्हाला आत्मविश्वास असेल तर तुम्ही आपोआप सुंदर दिसता.

३) आपण कुठल्या प्रसंगासाठी जातोय, बाहेर तापमान काय आहे, दिवस आहे की रात्र, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कपडे परिधान करा.

४) कम्फर्टेबल कपडे परिधान करा. तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर तुम्हाला वावरणं सोपं जातं.

५) अॅक्सेसरीज घालताना लक्ष द्या, की तुम्ही ओव्हरड्रेस्ड तर नाही होत आहात. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT