Fashion Tips  esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : पंपाने हवा भरल्यासारखी फुगते ऑर्गेंझा साडी, या टिप्स वापरा साडी चापूनचोपून बसेल

ऑग्रेंझा साडीवर कोणत्या ऍक्सेसरीज उठून दिसतात

Pooja Karande-Kadam

Fashion Tips : मुलींनी वेस्टर्न लुक्सवर कितीही फोटोज काढले तरी साडी आवडत नाही, त्यावर फोटोशूट केले नाही अशी एकही मुलगी सापडणार नाही. सणासुदीचा काळ असो किंवा लग्न, त्यांना चांगले कपडे घालणे आणि पारंपारिक पोशाख घालणे आवडते. पण अशा अनेक मुली आहेत ज्यांना साडी नीट कशी नेसायची हेच कळत नाही.

त्यातही सिल्क किंवा ऑर्गेंझा प्रिंट असेल तर साडी परफेक्ट बसतच नाही. त्यावेळी मोकळा पदर सोडावा लागतो. पण, मग कामं सोडून पदर सांभाळत बसावं लागतं. त्यामुळे पदर पिनअप करणं गरजेचचं असतं.

ऑर्गेंझा साडी अशी नेसलीत तर उठून दिसते

जेवढं कठीण एखाद्या कपाटात कपडे बसवणं असतं तितकच अवघडं साडीच्या निऱ्या आणि पदर फिट करणं असतं. ऑर्गेंझा साडीची सध्या क्रेझ आहे अशात ती हवा भरल्यासारखी फुगते म्हणून तुम्ही नेसणार नसाल तर तो साडीवर अन्याय होईल. त्यामुळेच ही साडी चापूनचोपून कशी बसवायची हे आपण पाहुयात.

ब्लाउजची चॉईस

या साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ब्लाउजच्या डिझाइनची काळजी घ्यावी लागेल. कारण कोणत्याही डिझाईनचा जड ब्लाउज शिवला तर साडीचा लूक चांगला दिसणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही साध्या कापडाचा व्ही नेक ब्लाउज डिझाइन करून या साडीसोबत घालावा. त्याची बाही कशी ठेवायची हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.

ब्रॉड प्लीट्स बनवा

जर तुम्ही साडीचे प्लीट्स छोटे केले तर तुम्ही जाड दिसाल. पदराच्या प्लीट्स मोठे केल्यास चांगले. यामुळे तुम्ही स्लिम दिसाल. कमरेच्या जवळ प्लीट्स बनवू नका तर ते प्लेन ठेवा. यामुळे तुम्ही स्लिम दिसाल.

साडीच्या नीऱ्या ब्रॉड ठेवा

प्लीट्स खोचताना काळजी घ्या

प्लीट्स बनवून तयार झाल्यानंतर त्या खोचण्याआधीच तुम्ही त्यांना एका पिनने सेफ करा. ज्यामुळे त्या पसरणार नाहीत. तसेच, प्लीट्स ब्रॉड केल्याने त्या जास्त फुगीर वाटणार नाहीत.

अॅक्सेसरीज वापरा

साडी तेव्हाच चांगली दिसते जेव्हा तुम्ही त्यात अॅक्सेसरीज घालता. यासाठी तुम्हाला नेकलेस सेट आणि कानातले यांसारख्या कमीत कमी अॅक्सेसरीज घालावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बांगड्या आणि अंगठ्याही स्टाइल करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुमचा लुक देखील सुधारेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल.

साडीवर अशी ट्रेंडी ज्वेलरी सूट करते

बेल्ट

साडी ट्रॅडिशनल असो वा पार्टीवेअर त्यावर बेल्ट असेल तर जास्त कंफरटेबल वाटतं. तसेच बेल्ट वापरल्याने ही साडी चापूनचोपून बसते. आणि साडीला सूट होईल असा बेल्ट वापरल्याने स्पेशल लुकही येतो.

या टिप्स फॉलो करा आणि तुमची ऑर्गन्झा साडी चांगली स्टाईल करा, तुम्ही स्लिम आणि सुंदर दिसाल.

साडीला असा बेल्ट असेल तर शोभून दिसते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Criminal Law: विवाहपूर्व संबंध ठेवणे; सरकारवर टीका करणे गुन्हा ठरणार, नवा कायदा लागू, नव्या तरतुदींमुळे मोठी उलथापालथ

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

January Horoscope 2026: जानेवारी महिन्यात कोणत्या राशींवर राहणार रोचक राजयोग? टॅरो कार्ड्सनुसार जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

SCROLL FOR NEXT