Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : दिवाळीला काय घालायचं? कृति सेननचा लुक करा रिक्रीएट!

हिरोपंती चित्रपटातून क्रिती सेननला मोठ्या पडद्यावर पदार्पण करून सात वर्षे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : हिरोपंती चित्रपटातून क्रिती सेननला मोठ्या पडद्यावर पदार्पण करून सात वर्षे झाली आहेत. कृति सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते. तिचे 37 मिलीयन्सहुन अधिक फॉलोअर्स आहेत. गेल्या 7 वर्षात अनेक गोष्टी बदलल्या फक्त एक गोष्ट आहे जी बदललेली नाही आणि ती म्हणजे कृतिची ऑन-ट्रेंड स्टाइल. तुम्ही तिच्या इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल केल्यास तुम्हाला दिसेल की, ती किती ट्रेंडी राहते. दिवाळी जवळ आलीय त्यामुळे तूम्ही काय खरेदी करावं याचा विचार करत असाल तर कृतीची स्टाइल तूम्ही कॉपी करू शकता. तिचे अनेक एथनिक वेअर्स लोकप्रिय आहेत. कृतीचे काही ड्रेसचा तर ट्रेंड बनला आहे.पाहुयात तिचे काही फॅन्सी लुक्स.

गॉर्जियस बेज लेहंगा

अयोध्येत आदिपुरुषच्या टीझर लॉन्चच्या वेळी कृतीने एंबेलिश्ड बेज रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तुम्हाला एक क्लासी लूक हवा असेल तर, हा म्यूट-कलर्ड एथनिक आउटफिट दिवाळीसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

प्रिंटेड अनारकली विद डिटेल्ड बॉटम

एका ऑफबीट लुकसाठी कृतीने असा सुंदर, फ्लोरल प्रिंटेड अनारकली ड्रेस घातला होता. फेस्टीव्ह सिझनसाठी तुम्‍हाला वाइब्रेंट प्रिंट्स आणि रंगांसह फुल-लेंथ, फ्रंट स्लिट अनारकलीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

फ्लोरल प्रिंटेड साड़ी

दिवाळीत साडीचाच हट्ट करणाऱ्या महिलांसाठी कृतीचीही फ्लोरल प्रिंटेड साडी अप्रतिम ऑप्शन आहे. यावर स्लीव्हलेस ब्लाउज आधिक स्टायलीश दिसेल. हा क्लासी लूक पूर्ण करण्यासाठी तूम्ही केसात नाजूक फुले घालू शकता.

शीयर एलिगेंस

क्रिती सॅननची ब्लू शीयर साडी गॉर्जियस आणि फ्रेश फेस्टिव लुक देते. हा लुक कंप्लीट करण्यासाठी ड्यूई मेकअप आणि कमी ज्वेसरी युज करा.

फ्लोई अनारकली

क्रिती सॅननची ही फ्लोरल अनारकली रेट्रो लुक आवडणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी आहे. पूर्ण शोल्डर असलेल्या अनारकलीला पूर्ण लुक देण्यासाठी ऑक्सिडाइज्ड कानातले आणि फ्लोरल अॅक्सेसरीजसह स्टाइल करावी.अगदी साधा,सिंपल पण तितकाच आकर्षक असा हा लुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT