Saree Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

ब्लाउजऐवजी कुर्ती, टॉप अन् जॅकेटवर नेसा साडी! राहा स्टायलिश

अशावेळी दिसाल खूप स्टायलिश

सकाळ वृत्तसेवा

कोणत्याही कार्यक्रमात स्त्रिया साडी नेसून आल्या की त्यांच्या सौंदर्यात जणू चार चाँद लागतात.

आपल्या भारतीयांची साडी (Saree) ही ओळख आहे तसेच एक पारंपारिक वस्त्र आहे. असं म्हटलं जातं साडी हे स्त्रीचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात स्त्रिया साडी नेसून आल्या की त्यांच्या सौंदर्यात जणू चार चाँद लागतात. विशेष म्हणजे स्त्रियांची ही आवड लक्षात घेता बाजारातही विविध डिझाइनच्या आणि प्रकारच्या साडी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. महिलांना साडी नेसल्यावर ग्रेसफुल लुक देण्यासोबतच त्यांच्या सौंदर्यातही भर पडते. अनेकांना साडी नेसायला खूप आवडते. तुम्ही ब्लाउजऐवजी साडीवर आणखीन काही एक्सपेरिमेंट केल्यास आणखी सुंदर दिसू शकता. चला तर मग तुम्हाला एकदम स्टायलिश दिसायचं असेल तर साडीसोबत काय ट्राय कराल हे पाहुयात.

साडीसोबत ओव्हरकोट (Overcoat) हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही तुमच्या साडीसोबत कोणत्याही रंगाचा ओव्हरकोट कॅरी करू शकता. हे तुम्हाला थंडीपासून वाचवेल आणि तुम्हाला स्टायलिश लुकही देईल. तुम्हाला हवे असल्यास साडीशी मॅच होणारा ओव्हरकोटही तुम्ही कॅरी करू शकता.

साडीसोबत टी-शर्ट (T-shirt) किंवा टॉप घालणे हा अतिशय स्टायलिश एक्सपेरिमेंट असू शकतो. यामध्ये, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही साडीशी मॅच होणारा टी-शर्ट किंवा टॉप घालू शकता किंवा तुम्ही साडीच्या कॉन्ट्रास्टमध्ये काहीतरी ट्राय करू शकता.

साडीसोबत ब्लाउज ऐवजी तुम्हाला कुर्ता वेगळा लुक देईल. ही एक्सपेरिमेंट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लॉंग किंवा लहान कुर्ता (Kurta) वापरु शकता. यामध्ये पदराला कुर्त्याच्या वरुन पिनला अटॅच करा आणि फॅशनेबल राहा.

जर तुम्हाला हिवाळ्यात रात्रीच्या फंक्शनला जायचे असेल, तर तुम्ही साडीसोबत हाय नेक टिशर्ट किंवा ब्लाउज कॅरी करू शकता. हे तुम्हाला पूर्णपणे वेगळा आणि स्टायलिश लुक देईल. यासोबत तुम्ही मोत्यांची माळही घालू शकता.

जर तुम्ही डे पार्टीला जाणार असाल किंवा तुमच्या कुटुंबासोबत लंचचे प्लॅन करत असाल तर साडीसोबत लेदर, डेनिम किंवा एथनिक जॅकेट (Ethnic jacket) घालून तुम्ही या ड्रेसिंगचा आनंद घेऊ शकता आणि पार्टीत हटके लूक मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

West Bengal BJP Victory : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, डोनाल्ड ट्रम्पही झाले प्रभावित; पंतप्रधान मोदींचे केले खास अभिनंदन

Pune News : खाशाबा चित्रपटाच्या स्थगितीबाबत नागराज मंजूळेंसह जिओला नोटीस

SCROLL FOR NEXT