Fathers Day 2024 : esakal
लाइफस्टाइल

Fathers Day 2024 : वयात येणाऱ्या मुलासोबत Bonding बनवणं तसं अवघडच? प्रत्येक बाबाच्या कामी येतील अशा टिप्स!

मुलासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवा

Pooja Karande-Kadam

Fathers Day 2024 : मूलं साधारण दहा-बारा वर्षांचे झाले की, ते आता मोठे झाल्याची जाणीव पालकांना व्हायला लागते. खरे तर बालपण अजून पुरते न संपलेले आणि तारुण्य तसे दूर, असा हा १० ते १८ वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे किशोरावस्था. एकवेळ नुकतेच जन्माला आलेल्या बाळाला सांभाळणं सोप्पय पण वयात येणाऱ्या मुलाला समजून घेणं तसं खरंच अवघड आहे.

या वयात मुलांशी आपली वागणूक बददली नाही. त्यांना समजून घेणारे पालक भेटले नाही. तर मुलांची विनाकारण चिडचिड होते. या काळात मुलांवर चिडणं, त्यांचा तिरस्कार करणं अशी वागणूक देऊन त्यांना चालत नाही. कारण, मुलांच्या मानसिकतेतही या वयात अनेक बदल जाणवतात. मी कोण? माझे या जगात येण्याचे प्रयोजन काय? सामाजिक परिघात माझे नेमके स्थान काय?

अशा प्रश्नांनी किशोरांच्या भावविश्वात खळबळ उडते. सतत दुसऱ्यांशी तुलना करून आपली जागा तपासून बघितली जाते. स्वतःला सिद्ध करायची धडपड सुरू होते. त्यामुळेच मुलांना योग्यरीत्या समजून घेणं त्यांना आधार देणारा बाप होणं प्रत्येकालाच शक्य होत नाही.

सध्या तुमचं मुलंही किशोरवयाच्या टप्प्यावर असेल तर त्याच्याशी घट्ट नाते कसे निर्माण करावे याबद्दल आज माहिती घेऊयात. आम्ही सांगितलेल्या काही टिप्स तुमच्या नक्कीच कामी येतील.  

प्रत्येक नात्यात नसतो त्याहुन कितीतरी जास्त गोडवा बाप-लेकाच्या नात्यातही गोडवा असतो. काळाच्या ओघात आई-मुलगी एकमेकांना मैत्रिणींसारखे वागवतात, पण अनेक कारणांमुळे वडील आपल्या मुलाचे मित्र होऊ शकत नाहीत. म्हणूनच वडिलांनी आपल्या मुलाचा मित्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या मुलासोबत चांगला वेळ घालवा

या बिझी लाईफस्टाईलमध्ये स्वत:साठी वेळ काढणे अवघड आहे, पण वडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढायला हवा. आपल्या मुलांबरोबर त्यांच्या सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. सुट्टीच्या दिवशी त्यांच्याबरोबर कुठेतरी जा. तसेच मुलांबरोबर खेळा आणि त्यांना घरातील कामात सोबत येण्यास सांगा. असे केल्याने तुम्ही तुमचे नाते दृढ करण्यात यशस्वी व्हाल.

मुलासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवा

मुलं जे पाहतात ते शिकतात, म्हणून वडिलांनी स्वत:ला नेहमी मुलांसमोर एक चांगलं उदाहरण म्हणून मांडायला हवं. या उदाहरणामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. प्रत्येक पालकांना आपल्या मुलामध्ये चांगले गुण हवे असतात. म्हणूनच ही गोष्ट महत्त्वाची ठरते.

मुलांच ऐकून घ्या

कामाच्या व्यग्रतेमुळे अनेकदा वडिलांना आपल्या मुलाचे शब्द निरर्थक किंवा निरर्थक वाटतात, पण या त्याच्या भावना आहेत हे विसरू नका. आई-वडील दोघेही कामात व्यग्र असताना मुलं आपलं बोलणं स्वत:मध्ये दडपून टाकतात.

मुलांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. असे केल्याने मुलांना आनंद मिळतो.

मुलांमध्ये चांगले बदल घडवा

हाच काळ शिक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. वाढलेल्या अभ्यासाचा आवाका, परीक्षेची भीती, भविष्याची चिंता याचा अस्वस्थ मनावर ताण येतो. तो घालवायचे मित्रांकडून कळलेले काही उपाय जसे व्यसन, दारू तंबाखू वापरून बघायची हुक्की येते. आणि मग कधी सवय लागते हे त्या अवस्थेत कळतही नाही.

आपल्या मुलांमधील हे बदल बघून पालकही गोंधळतात. मुलांशी वागावे तरी कसे, हेच कळेनासे होते. मुलांच्या डोक्यात काय चाललंय, याचा अंदाज येईनासा होतो. अशा प्रसंगी मुलांवर चिडचिड न करता त्यांना समजून घ्या. त्यावर मार्ग काढा. मुलांचे मित्र बना ज्यामुळे मुलं तुमच्याकडे सल्ला मागायला येतील. त्यामुळे ते वाईट संगतीत जाणार नाही.

मुलांना मोकळेपणा द्या

मुलांना सुधरवण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे मुळात त्यांना बिघडू देऊ नका. यासाठी काय करायचं तर मुलांना इतर मुलांसोबत मिक्स होऊ न देणं, सतत त्यांना फोन करून त्यांचे अपडेट घेणं. या गोष्टी बंद करा. मुलांना मोकळीक दिली तरी ते बिघडणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्या.

मुलांवर दबाव टाकू नका

मुल किशोरावस्थेत येता तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रसंग उभे राहतात. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेलं शिक्षण, करिअऱ हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यात तुम्ही मुलांना मदत करा. मुलांना ज्यात आवड आहे असे शिक्षण द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT