Wholesale Saree Market in Pune Esakal
लाइफस्टाइल

Saree Market in Pune: साडी खरेदीची हौस पुरी करायचीये...मग हे वाचाच...

आज आम्ही तुम्हाला पुण्यातील काही साडी मार्केटबद्दल सांगणार आहोत. पुण्यातील या मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये तुमच्या मनाजोगी साडी खरेदी करणं शक्य होईल

Kirti Wadkar

Wholesale Saree Market in Pune: महिला Womenआणि त्याचं साड्यांवरील प्रेम हे तर जगजाहिर आहे. प्रत्येक महिलेला आपल्याकडे सगळ्याचं प्रकारच्या आणि सुंदर साड्या असाव्या असं कायम वाटतं असतं.

लग्नकार्य असो किंवा सण Festivals महिलांना साडी खरेदी करण्यासाठी केवळ एखादं निमित्त हवं असतं. Favorite Destinations in Pune For Saree Shopping

अनेक महिल्यांच्या वॉर्डरोबमध्ये Wardrobe अगदी रोजच्या वापरातील साध्या साड्यांपासून जरी काठाच्या महागड्या साड्यांचं कलेक्शन Saree Collection पाहायला मिळतं. साडीमध्ये प्रत्येक मुलीचं किंवा स्त्रीचं सौदर्य खुलून दिसतं. 

खरं तर साडी म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बजेट कमी असो किंवा जास्त पण साडी खरेदी करताना दुकानात गेल्यावर सगळ्यात उत्तम साडी कमीत कमी किमतीत खरेदी करण्याचा महिला वर्गाचा अट्टहास असतो.

प्रत्येकीला साडी खरेदी करताना चांगल्या क्वालेटीची साडी मात्र ती स्वस्तात हवी असते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला पुण्यातील काही साडी मार्केटबद्दल सांगणार आहोत. पुण्यातील या मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये तुमच्या मनाजोगी साडी खरेदी करणं शक्य होईल. 

हे देखिल वाचा-

१, रविवार पेठ, मनिष मार्केट- जर तुम्हाला स्वस्त्यात मस्त आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची खरेदी करायची असेल तर तर पुण्यातील रविवार पेठ गाठून मनिष मार्केटचा फेरफटका नक्की मारा. या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक मोठी होलसेल आणि रिसेलची दुकानं आढळतील.

साडी खरेदीसाठी मनिष मार्केट एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला स्वत:साठी साडी खरेदी करायची असेल किंवा भेट म्हणून देण्यासाठी किंवा लग्नाचा बस्ता यासाठी मनिष मार्केटमध्ये अनेक दुकानं आहेत.

मनिष मार्केटमध्ये असलेलं १०० वर्ष जुनं श्रीराम साडी शॉपमध्ये तुम्हाला हरतर्हेच्या साड्या मिळतील. अगदी कमी दरात उत्तम दर्ज्याच्या आणि प्रकारच्या साड्या तुम्हाला इथं मिळतील. लिनन कॉटन पैठणी तसचं सिल्कच्या विविध साड्यांचे प्रकार मुबलक दरात मिळतील. सहावारी प्रमाणेच नऊवारी साड्यादेखील इथं उपलब्ध आहेत. 

मनिष मार्केटमध्ये असलेलं आणखी एक जुनं दुकान म्हणजे रमेशचंद नारायणदास क्रिएशन. साड्यांच्या या ३ मजली शोरुममध्ये तुम्हाला अगदी पारंपरिक डिझायइनपासून डिझायनर साड्या मिळतील त्याही कमी दरात. अगदी १०० रुपयांपासून या दुकानात साड्या उपलब्ध आहेत. 

हे देखिल वाचा-

२. खडकी मार्केट- पुण्यात साडी खरेदी करायची असेल तर खिडकी बाजारमध्ये तुम्हाला एकदा चक्कर मारावी लागेल. खडकी बाजारमध्ये साड्यांची अनेक दुकानं आहेत. अगदी होलसेल दरामध्ये तुम्हाला इथे लेटेस्ट डिझाइनच्या आणि ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या मिळतील ते ही योग्य दरात. 

३. के.के मार्केट- पुण्यातील के.के मार्केटमध्ये साड्यांची उत्तोमत्तम दुकानं आहेत. अगदी लगीनसराईची खरेदी असो किंवा सणासूदासाठी साडी हवी असेल तर तुम्हाला के.के मार्केटमध्ये फेरफटका मारवा लागेल. 

या मार्केटमध्ये सगळ्यात भव्य असं द्वारकादास शामकुमार साडी शोरुम आहे. या शोरुममध्ये तुम्हाला घाऊक दरात साड्या मिळतील. एक से बढकर एक साड्या इथं तुम्हाल जवळपास निम्म्या दरात मिळतील. 

5 फुरसुंगी टेक्सटाईल मार्केट-  फुरसुंगी टेक्सटाईल मार्केट हा देखील साडी खरेदीसाठी एक चांगला पर्याय आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्तात मस्त साडी मिळेल इथं १०० बून अधिक साड्यांची दुकानं आहेत. इथल्या महालक्ष्मी साडी डोपोमध्ये अगदी ३५ रुपयांपासून साड्या उपलब्ध आहेत. तर इथल्या फाल्गुनी स्टोरमध्ये १५० रुपयांपासून अगदी लाखापर्यंतची साडी तुम्हाला मिळेल. 

तसचं कलादालन, श्री गायत्री सारीज, महादेव मिल डेपो अशी साड्यांची अनेक मोठी दुकान इथं आहेत. 

५ लक्ष्मी रोड- अगदी सोने खरेदी असो किंवा लग्नाचा बस्ता आणि स्ट्रीट शॉपिंगसाठी पुण्यातील लक्ष्मीरोडला एकदा तरी फेरफटका माराच. इथं साड्यांची एक से बढकर एक दुकानं आहेत. इथं वस्त्रांगण, कजरी, हिन्द सारीज्, श्री बालाजी सारी सेंटरमध्ये लावण्या अशी अनेक साड्यांची दुकानं आहेत. 

६ मूळचंद मिल- स्वस्त्यात मस्त आणि मनाजोगी साडी खरेदी करण्यासाठी मूळचंद मिल हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यात विविध ठिकाणी मूलचंद मिलचे आउटलेट आहेत. सिंहगड रोड, हडपसर इथं आउटलेट आहेत. इथं तुम्हाला सिल्क साड्या तसचं पैठणी आणि बनारसी शालू जवळपास अर्ध्या किमतीत मिळतील. 

तसंच जर तुम्हाला रेडीमेड नऊवारी साडी खरेदी करायची असेल तर शनिवार पेठेतील महालक्ष्मी मार्केट तसचं लक्ष्मी रोडवर तुम्हाला त्या सहज उपलब्ध होतील. 

तेव्हा आता तुम्हाला साडी खरेदीसाठी धावपळ करण्याची गरज नाही. पुण्याला या आणि मनसोक्त खरेदी करा साड्यांची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT