avoid indoor pollution
avoid indoor pollution esakal
लाइफस्टाइल

घरातील प्रदूषण कसे टाळावे? निरोगी राहण्यासाठी करा हे उपाय

सकाऴ वृत्तसेवा

विशेषत: श्वासोच्छवासाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही घरातील प्रदूषण नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे

सध्याच्या बाहेरील प्रदूषणाप्रमाणेच घरातील प्रदूषणही (Indoor Pollution) आरोग्याला हानी पोहोचवत आहे. सत्य हे आहे की बंद दरवाज्यांमधील हवा कमी प्रदूषित (Polluted) नाहीयेय. विशेषत: श्वासोच्छवासाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही घरातील प्रदूषण नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थच्या मते, गेल्या दोन दशकांमध्ये भारताच्या घरातील वायू प्रदूषणामुळे (Air pollution)होणाऱ्या मृत्यूंची संख्या (Number of deaths)झपाट्याने वाढली आहे. बाहेरील घरांप्रमाणेच घरातील हवेची गुणवत्ताही (Air quality)दिवसेंदिवस खालावत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटने (WHO)च्या अहवालानुसार, घरातील प्रदूषकांमुळे दरवर्षी जगभरात 80 लाख लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एवढेच नाही तर प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक घरातील प्रदूषणाची भूमिका दिसून आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये, घरातील प्रदूषित हवेचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येते. प्रदूषित हवेमध्ये दीर्घकाळ राहिल्याने हृदयाचे अनियमित ठोके (Irregular heartbeat)आणि दमा (Asthma)यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. अशावेळी या सोप्या टिप्स (Tips)तुम्हाला घरातील प्रदूषण (Indoor pollution) टाळण्यासाठी मदत करतील.

- घरामध्ये धुम्रपान (Smoking)करू नका.

- कचरा (Garbage)कमी करा

- घरात ताजी हवा (Fresh air)आणि प्रकाश (Light)ठेवा. खिडक्या (Windows)आणि स्कायलाइट्स (Skylights)असल्याची खात्री करा.

- क्लिनर (Cleaner)आणि इतर साफसफाईची उत्पादने (Cleaning products),नेलपॉलिश (Nail polish), हेअर स्प्रे (Hair spray)आणि स्वयंपाक (Cooking) इत्यादींच्या प्रक्रियेतूनही अनेक हानिकारक रसायने तयार होतात.

- पुरेशा वायुवीजना (Ventilation)च्या अनुपस्थितीत, ते घरात साचत राहतात, ज्याचा वाईट परिणाम होतो.

- घरात किटक (Insects) आणि झुरळे (Cockroaches)वाढू देऊ नका.

- धूळ (Dust) हे अॅलर्जीचे प्रमुख कारण आहे. कार्पेट्स (Carpets), फूटबोर्ड (Footboard) आणि मॅट (Mat) इत्यादींची नियमित स्वच्छता करा.

- एक्झॉस्ट फॅन (Exhaust fan)आणि एअर प्युरिफायर (Air purifier)देखील लावू शकतात.

- घरामध्ये आणि आजूबाजूला झाडे लावा (Plant trees).

- ओले कपडे (Wet clothes)घरामध्ये वाळवू नका. सतत आर्द्रतेमुळे दम्याची समस्या वाढते.

- कचरा झाकून ठेवा. (Keep the trash covered)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT