Ganesh Chaturthi 2023 esakal
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2023 : या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये लाडाची लेक माहेरी आल्या प्रमाणे गौरींची आरास, नैवेद्य केले जातात

Pooja Karande-Kadam

Ganesh Chaturthi 2023 : श्रावणापासूनच हिंदू धर्मात सण-समारंभांना सुरूवात होते. श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. यंदा भाद्रपद मासातील चतुर्थी तिथीला म्हणजेच १९ सप्टेंबरला गणराज भक्तांच्या घरी विराजमान झाले आहेत.

गणेशानंतर ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये लाडाची लेक माहेरी आल्या प्रमाणे गौरींची आरास, नैवेद्य केले जातात. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. कोल्हापुर, कर्नाटक भागात गौराई शंकरोबा सोबत येते. तर कराड, सातारा सांगलीकडे गौराई गंगा या आपल्या बहिणीसह येते. (Ganesh Chaturthi 2023)

यंदाच्या गौरी आगमन आणि पूजनाचा मुहूर्त कधी आहे?

गुरुवार दिनांक २१-९-२३ रोजी गौरी आणण्यासाठी अनुराधा नक्षत्र असावे लागते. ते दुपारी ३.४५ पर्यंत आहे. पण दुपारी १.३० ते ३ राहू काळ असलेने गौरी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी ६.२७ पासून दुपारी ३.३४ पर्यंतच आणाव्यात. (Ganesha)

गौराई पूजन आणि जागरण

शुक्रवारी गौराईचा नैवेद्य आणि जागरण असते. प्रत्येक गावातील प्रथेप्रमाणे महिला गौराईचे जागरण करतात. गौराईची गाणी आणि तिच्यासाठी स्पेशल पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरी विसर्जन

शनिवार दिनांक २३-९-२३ रोजी गणपती, गौरी विसर्जन आहे. मूळ नक्षत्र दुपारी २.५६ पर्यंत आहे. त्या वेळेत विसर्जन करावे किंवा त्यावेळेस मूर्ती हलवून ठेवावी. व नंतर आपल्या सोयीने गणपती गौरीचे विसर्जन करावे. या दिवशी घरगुती गणपतींचे विसर्जनही होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT