Garden Cress Benefits esakal
लाइफस्टाइल

Garden Cress Benefits: स्नायू, कंबरदुखी, मासिक पाळी अशा अनेक आजारात महिलांची साथ देते अळीव, रोज करा सेवन

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी संजिवनी बुटीच आहे अळीव

Pooja Karande-Kadam

Garden Cress Benefits:

मासिक पाळी येण्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात स्त्रीचे शरीर आंतरीक कमकुवत होते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता देखील होते. त्यामुळे महिलांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. अळीवच्या बियांचे सेवन करणे देखील महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

महिलांच्या अनेक आजारांवर औषधांनी काही फरक पडत नाही. प्रेग्नंसी दरम्याचा त्रास, सिझरींगसारख्या शस्त्रक्रिया यांमुळे महिलांच्या शरीराचे अनेक हाल होतात. या विषयावर आहारतज्ञ रमिता कौर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अळीवमध्ये काय गुणधर्म असतात

अळीवमध्ये आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे ए, सी, बी आणि ई सोबत लोह, फोलेट, फायबर आणि प्रथिने यांसारखे अत्यावश्यक गुणधर्म असतात, जे स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

प्रतिकारशक्ती वाढवतात

इतर फळे आणि भाज्यांच्या तुलनेत अळीवमध्येही भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतात.

मासिक पाळीच्या तक्रारी

महिलांचे एकंदर आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, मासिक पाळी संतुलित असणे देखील महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक महिला मासिक पाळी वेळेवर होत नाही, अशी तक्रार करतात. अळीवच्या बियांचे सेवन केल्याने पीरियड्सचे चक्र टिकून राहण्यास मदत होते.

आईच्या दुधाचे प्रमाण वाढवते

स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दूध कमी असणे, अचानक दूध मागे सरकणे असे प्रकार होतात. त्यामुले प्रसुती झाल्यानंतर लगेचच अळीवाच्या बियांचे लाडू, खीर मातेला खायला द्यावी, यामुळे आईच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते.

हिमोग्लोबिन वाढवा

मुलाच्या जन्मानंतर, स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनची पातळी देखील असंतुलित होते. अशा परिस्थितीत, अळीवच्या बियांचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास आणि प्रसूतीनंतर लवकर बरे होण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

केस गळतीची आणि केसांच्या समस्यांची तक्रार करणाऱ्या महिलांसाठी अळीवच्या बिया फायदेशीर आहेत. अळीवच्या बिया केसगळती रोखण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याच वेळी, याच्या सेवनाने त्वचा देखील चमकदार राहते.

हाडे मजबूत करणे

अळीवच्या बियांमध्ये असलेले आवश्यक गुणधर्म हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळीही राखली जाते. ज्यामुळे उतरत्या वयात होणारी सांधेदुखी, कंबरदुखी यापासून आराम मिळतो.

अळीव बिया कशा वापराव्यात

अळीवच्या बिया नारळ, तूप, दूध यांसारख्या आरोग्यदायी स्निग्धांशांसह सेवन केल्या जाऊ शकतात. याचे सेवन करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ¼ हलीम बिया दुधासोबत घेऊ शकता.

अळीवच्या बिया खोबऱ्याच्या किसमध्ये लाडू बनवून किंवा दही, स्मूदी किंवा शेकमध्ये घालून खाऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा की एका वेळी ¼ चमचे पेक्षा जास्त घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT