Gauri Ganpati 2023 esakal
लाइफस्टाइल

Gauri Ganpati 2023 :  सोन्याच्या पावलांनी गौराई आली अंगणी; जाणून घ्या गौराईच्या आगमनाचे संपूर्ण विधी

ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून गौराईला ज्येष्ठा गौरी म्हणतात

Pooja Karande-Kadam

Gauri Ganpati 2023 : गणेशाचे आगमनाची वाट आतुरतेने जसे तरूण मुलं पाहत असतात. अगदी तशीच घरातील गृहलक्ष्मी गौराईची वाट पाहतात. गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौराई माहेरी येते. माहेरी आलेली लेक असल्याप्रमाणेच तिचे लाड केले जातात. गौराईला नवी साडी चोळी करतात.

खेडेगावत तर आजही नागपंचमीपासूनच गौराईच्या गाण्यांचा फेर धरा जातो. गौराईची गाणी, झिम्मा फुगडीचे खेळ रात्रभर चालतात. गौराईच्या जागरणादिवशी तर पहाटे पर्यंत हे खेळ रंगतात आणि गौराईच्या दर्शनाने मग खेळांची समाप्ती होते. (Gouri pujan vidhi in marathi)

अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन करुन नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जन होतं.

भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.  

गौराई पूजन विधी

पश्चिम महाराष्ट्र  विशेषतः कोल्हापूर भागात  या दिवसात येणाऱ्या तेरड्याची पूजा गौरी म्हणून होते.  इथं गौरी म्हणजे गणपतीची आई ती एकटी येत नाही तिच्याबरोबर तीची थोरली बहीण आणि धाकटी सवत गंगा येते‌.

पाणवठ्यावर जाऊन भरलेल्या कळशीत सात खडे टाकून त्यावर चाफ्याच्या पानांनी बांधलेले तेरड्याचे डहाळे ठेवायचे.  पाणवठ्यावर पान सुपारी काकडीचे काप हळदीकुंकू वाहून वाजत गाजत घरी यायचं. ती  येतानाच गाणी म्हणत खेळत येते.

अपवाद म्हणून काही घरात ती तोंडांत पाण्याची गुळणी धरून मौन धरून येते. पायावर पाणी घालून ओवाळून आत घेतली की चूळ भरून बोलते. सगळ्या घरात फिरत मग शेवटी ठरलेल्या जागी बसते. तिच्या फेरीच्या मार्गावर हळदीकुंकवाचे पायाचे ठसे उठवलेले असतात. (Ganesh Chaturthi 2023)

गौराईला घरात आणून गणेशाच्या बाजूला बसवलं जातं. काही ठिकाणी आजच तिची पूजा करून तिला साज-श्रृंगार केला जातो. तर, काही ठिकाणी उद्या दुपारनंतर गौराई उभारल्या जातात.

गाण्यात गवराबाई हे मुख्य पात्र. गौरी आल्या की त्यांना मिसळ पालेभाजी म्हणजे शेपू भोपळी चवळी तांदळी पातरी अशा सगळ्या पाल्याची एकत्र भाजी  फळभाजी एखादी. अळूची किंवा पाटवडी भाकरी असा शिदोरीचा नैवेद्य दाखवतात. आमच्या ओळखीच्या एका घरी तर गौरी भाकरी खाऊन झोपवतात.

अक्षरशः डहाळे काढून आडवी झोपवतात. आणि मग उन‌ खाली आलं की चहा पाणी देतात.  थोडक्यात एक सासरी नांदणारी लेक माहेराला आली की काय करेल ते सगळं गौराई साठी करायचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT