Giloy Magical Benefits esakal
लाइफस्टाइल

Giloy Magical Benefits : ताप कमी करते अन् प्रतिकारशक्ती वाढवते; गुळवेलीचे आहेत भरमसाठ फायदे!

गुळवेलीचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असे आहे

Pooja Karande-Kadam

Giloy Magical Benefits : आपल्या आसपास अनेक अशा वनस्पती आहेत. ज्याच्या सेवनाने अनेक असाध्य आजारही बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे गुळवेल. गुळवेल हे नाव अनेकांसाठी नवे असेल. पण या वेलीचे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

गुळवेलला गुडूची असेही म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) असे आहे. गुळवेलला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुळवेलाला अमरत्वाचे दिव्य अमृत म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या जादुई गुणधर्मामुळे ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, संधिवात, व्हायरल फिव्हर, खोकला, सर्दी, ऑटोइम्यून डिसीज, डायबेटिस इत्यादींवर हे अतिशय प्रभावी सिद्ध होते.

यामुळे तणावाची पातळी कमी होते, स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूची शक्ती वाढते. या व्हायरल काळात प्रतिकारशक्ती खूप महत्त्वाची असल्याने गुळवेल किंवा गुडुचीचे गुणधर्म जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

गुळवेलमध्ये असलेले गुणधर्म

गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

डेंग्यूसाठी फायदेशीर

जर योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात गुळवेलचे सेवन केलं तर आपल्याला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. पानाच्या आकाराच्या असलेल्या या औषधी वनस्पतीचा रंग गडद हिरवा असतो. डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. या औषधाच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.

हाडांमधील वेदना पळवते

ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते. या वनस्पतीला अमृतवेल असंही म्हटलं जाते. वात, तापानंतर येणारा अशक्तपणा, भूक न लागणे, रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होणे इत्यादी समस्यांवर उपाय म्हणून गुळवेलीचे सेवन करावे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर तुम्ही त्याचा सहज वापर करू शकता. गुळवेल कसे वापरावे ते पाहुयात.

गुळवेलीची ताजी पाने व देठ रात्रभर भिजवून, सकाळी १ ग्लास पाण्यात अर्धेपर्यंत उकळून घ्यावेत, ते पाणी गाळून त्याचे सेवन करावे.

गुळवेल ४०० मिली पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी १०० मिली पाणी घालावे. उकळून, गाळून प्यावे. आपण चवीनुसार गूळ घालू शकता. काढा उकळताना त्यात तुळशीची पाने, हळद आणि लवंग घालू शकता.

गुळवेल पावडर - सकाळी फक्त १ चमचा पावडर गरम पाण्यासोबत/मधाबरोबर घ्या.

गुळवेलचा रस

आपण दररोज सकाळी जेवणाच्या 1 तास आधी 10 मिली कोमट पाण्यात घालून हा रस पिऊ शकता. हा रस सर्वात शक्तिशाली परंतु पचण्यास जड आहे, केवळ चांगल्या चयापचय असलेल्या लोकांसाठी चांगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT