Ginger Store Tips esakal
लाइफस्टाइल

Ginger Store Tips: फ्रिजमध्ये ठेऊनही आले खराब होतंय, ही ट्रिक वापरा अन् कमाल बघा!

एक किंवा दोन आठवड्यापर्यंत कसे फ्रेश ठेवायचे आले

Pooja Karande-Kadam

Ginger Store Tips : चिकन मटणाची चवं वाढवणार, पावसाळ्यात चहाचा स्वाद वाढवणारं आलं सगळ्यांचच फेवरेट आहे. सध्याच्या लहानमुलांना आलेपाकबद्दल फार माहिती नसेल. पण खोकला सर्दी पळवण्याचा तो भारी फंडा होता. तर ते आलेपाक बनतं आल्यापासून.

आल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. त्यामुळे आले प्रत्येकाच्या घरात असतेच. ते कधी मटणाच्या रश्यात, तर कधी चहात घातले जाते. बरेच लोक आलं जास्त काळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात, तर बरेच लोक असे करणे योग्य आहे की नाही या संभ्रमात असतात.

चव वाढवण्यासाठी भाज्यांमध्येही आल्याचा वापर केला जातो. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आल्याचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

अनेकदा आले जास्त वेळ ठेवल्यास त्यातील रस आटतो. अशा परिस्थितीत आले फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला आलं कसे जपायचे ते सांगणार आहोत.

आले खाण्याचे फायदे

- आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा.

- सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात.

- मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. 

- रक्तातील चरबीची पातळी कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होता.

- सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा.

एक किंवा दोन आठवड्यापर्यंत कसे फ्रेश ठेवायचे आले

जर तुम्हाला आले एक किंवा दोन आठवड्यांच्या आत वापरायचे असेल तर तुम्ही ते खोलीच्या तापमानावरही सुरक्षित ठेवू शकता. लक्षात ठेवा, आले ओलसर ठिकाणी ठेवू नका. असे केल्याने बुरशी येऊ शकते. थेट सूर्यप्रकाशाऐवजी कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवा.

आले कसे साठवायचे

जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये आले जास्त प्रमाणात असेल आणि तुम्हाला ते जास्त काळ वापरायचे असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. लक्षात ठेवा की जर आले अशा प्रकारे फ्रिजमध्ये ठेवले तर ते सुकण्याचा धोका आहे. त्यामुळे हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास ते अधिक चांगले होईल, जेणेकरून ते अधिक काळ टिकेल आणि सुरक्षित राहील.

ते ओले ठेवू नका

जेंव्हा फ्रिजमध्ये आले ठेवता तेंव्हा ते ओले ठेवू नका. जर तुम्ही आले पाण्याने धुतले असेल तर ते काही वेळ पंख्याखाली चांगले सुकवलेले असेल आणि त्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवा.

ब्राऊन कागद वापरा

​​गुंडाळून किंवा तपकिरी कागदाच्या पिशवीत ठेवता येईल. असे केल्याने त्यात ओलावा राहणार नाही आणि तो बराच काळ टिकेल हवाबंद कंटेनर वापरा जर तुम्हाला आले जास्त काळ साठवायचे असेल तर त्यासाठी हवाबंद कंटेनर वापरू शकता.

इतकेच नाही तर फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवण्यासाठी तुम्ही झिपलॉक प्लास्टिक पिशव्या देखील वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की ते ओले नसावेत.

या गोष्टी लक्षात ठेवा

- अर्धे कापलेले आले लगेच वापरा. अशा प्रकारे कापलेले आले लवकर खराब होते.

- फ्रिजच्या बाहेर किंवा आत ठेवल्यानंतर आले सुकले असेल तर फेकून देऊ नका, पण कोरडे भाजून पावडर करा. ती पावडरही तुम्ही वापरू शकता.

- आले जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. या युक्तीने आले ठेवल्याने ते जास्त काळ ताजे राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT