Diet For Above Age Of 20 : हल्ली धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी वेळ काढणे एकप्रकारचे आव्हानच आहे. वयानुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार तुम्हाला योग्य पोषण मिळाले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर विशी पार केलेल्या तरुणींनी कोणत्या पदार्थांचा त्यांची डेली डाएटमध्ये वेळीच समावेश करून घ्यावा ते जाणून घेऊया.
निरोगी शरीरासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. मात्र बिझी लाइफस्टाइलमुळे अनेकांना सकस आहार घेणे शक्य होत नाही. महिलांना या कारणाने बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. वयाची वीस वर्षे ओलांडलेल्या मुलींनी त्यांच्या आहारात या पोषक तत्वांचा आवर्जून समावेश करून घ्यावा.
या वयात आहारात पोषक तत्वांचा समावेश करून घेतल्यास पुढे त्याचे आरोग्यदायी परिणाम तुम्हाला दिसून येतील. चला तर अशा पोषक तत्वांबाबत जाणून घेऊया.
फोलेट - फोलेट हार्ट हेल्थ, नर्वस फंक्शन, मसल हेल्थ, एनर्जी, डायजेशन, ब्लड हेल्थ, भूक कंट्रोल करणे, डोळ्यांच्या आणि स्किनच्या आरोग्यासाठी फार चांगले असते. यामुळे प्रेग्नंसीदरम्यान बर्थ डिफेक्टचा धोकाही कमी होतो.
फोलेटचा उत्तम स्त्रोत - ब्रोकली, चणे, हिरव्या पालेभाज्या
लोह - हार्मोनल बॅलेंससोबतच शरीराला विविध कार्यासाठी लोहाची गरज असते. लोह शरीराच्या सर्व भागांत आक्सिजनचा पुरवठा करते. लोहाचे सेवन व्हिटॅमिन सी सोबत केल्यास लोह शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते.
लोहाचा उत्तम स्त्रोत - मणुके, दाळ, सोयाबीन , तिळ
कॅल्शियम - कॅल्शियम बोन हेल्थ, दात, मसल फंक्शन, हार्मोनल बॅलेंससाठी फार कॅल्शियम फार महत्वाचे आहे.
कॅल्शियमचा स्त्रोत - रागी, पनीर, तिळाची पाने
व्हिटॅमिन डी - व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार आवश्यक असते. सूर्याची किरणे हा व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत आहे. शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फेटसारखे मिनरल्स पचवण्यासाठी कॅल्शियम फार महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डी शरीराची इम्युन सिस्टिम तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासून तुम्हाला सुटका मिळेल. (Diet Plan)
स्त्रोत - सूर्याची किरणे, मशरूम आणि अंड्याचा पिवळा भाग
व्हिटॅमिन ई - व्हिटॅमिन ई शरीरात अँटिऑक्सिडंट्ससारखे काम करते. इम्युनिटी, हार्मोनल बॅलेंस, इंफ्लेमेशनला कंट्रोल करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन ई चा स्त्रोत - बाजरा, आंबा, नारळ, जवस, अक्रोड
मॅग्नेशियम - मॅग्नेशियम हे शरीराला आवश्यक मिनरल्सपैकी एक आहे. यास 'मास्टर मिनरल' असेही म्हटले जाते. (Lifestyle)
मॅग्नेशियमचा स्त्रोत - केळी, एवोकॅडो, नट्स, हिरव्या भाज्या, अंजीर, ज्वारी
ओमेगा-३- फॅटी अॅसिड - ओमेगा-३ फॅटी अॅसिड शरीराला आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे ज्याची आपल्या शरीराला फार आवश्यकता असते. ओमेगा-३- अॅसिडची कमतरता भासल्यास शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
स्त्रोत - तूप, एवोकॅडो. ऑलिव्ह ऑइल, अक्रोड, चीया सीड्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.