लाइफस्टाइल

Gold Jewelry Care Tips : सोन्याच्या मौल्यवान दागिन्यांची काळजी कशी घ्यावी?

आधुनिक प्रकारचा हार दागिना कोणताही असो त्याची योग्य देखभाल व्हायला हवी

सकाळ डिजिटल टीम

दागिने हा महिलांचाच नाही तर पुरूषांचाही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दागिने मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे असे अनेक प्रकारचे आहेत. या सगळ्यात सोन्याचे दागिने अधिक लोकप्रिय आहेत. सोन्याचा घसघशीत हार, नाजूक माळ, मोत्यांचा पेशवेशाही दागिना, आधुनिक प्रकारचा हार दागिना कोणताही असो त्याची योग्य देखभाल व्हायला हवी.

सर्वसाधारणपणे सोन्याचे दागिने जास्त वापरले जातात. सध्या लग्नसराई सुरूय तर त्यामूळे नवरीमुलीला भरमसाठ सोने दिले जाते. त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची हे माहीत नसते. त्यामूळे ते तूटतात, खराब होतात. किंवा त्यावरील डिझाईन तूटते. अशावेळी नूकसानच जास्त होते. त्यामूळेच सोन्याच्या दागिन्यांची काळजी कशी घ्यायची हे पाहुयात.

- दागिने काळे पडले असल्यास ते कोमट पाण्यात दागिने १५ मिनिटे बुडवून ठेवा. त्यामुळे त्यात साचलेले धुलीकण निघून जातील.

- कोमट किंवा साध्या पाण्यात, सोडा वॉटरमध्ये थोडे लिक्विड डिटर्जंटचे काही थेंब टाकून त्यात थोडा वेळ दागिने भिजत घाला. नंतर हळूहळू ब्रशने साफ करा.

- दागिने साफ करताना लहान मुले दात घासण्यासाठी वापरतात तसा छोटा सॉफ्ट ब्रश वापरा.

- दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे असतील तर जास्त गरम पाणी किंवा उकळत्या पाण्याचा अजिबात वापर करु नका. पाण्याच्या उच्च तापमानामुळे दागिन्याला तडे जाण्याची शक्यता असते.

- दागिने वापरून झाले की कापसाच्या बोळ्याने किंवा कपड्याने ते पुसून घ्या आणि कोरडे करून झाल्यानंतरच ते बॉक्समध्ये भरून ठेवा.

- अनेकदा आपण अंगावर दागिने घालूनच आंघोळीला जातो किंवा धुणी भांडी करत असतो. या क्रियेत दागिने हे साबण किंवा शॅम्पूच्या संपर्कात येतात, यामुळे तुमच्या सोन्यावर असलेली झळाळी कमी होऊ शकते.

- सोन्याचे दागिने इतर कोणत्याही दागिन्यांसोबत ठेवू नका. शक्यतो प्रत्येक दागिन्यांसाठी वेगळा बॉक्स ठेवा. मोत्याचे, चांदीचे आणि इतर खोट्या दागिन्यांच्या संपर्कात सोन्याचे दागिने आल्यास ते काळे पडतात.

Gold Jewelry

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT