gosht paishapanyachi book esakal
लाइफस्टाइल

‘गोष्ट पैशापाण्याची’चा उच्चांक; हॅरी पॉटरच्या विक्रमाशी बरोबरी

ॲमेझॉन’वर टॉप १० पुस्तकांमध्ये ‘गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बचत आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगणारे ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे प्रफुल्ल वानखेडे यांचे पुस्तक ९ ऑक्टोबरला वाचकांच्या हाती पडणार आहे. बाजारात दाखल होण्यापूर्वीच तब्बल १२ हजार ६०० पुस्तकांची विक्री झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ‘ॲमेझॉन’वर टॉप १० पुस्तकांमध्ये ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाने आपले स्थान टिकवून ठेवले.

खरेदीसाठी नोंदणी करण्यास उपलब्ध झाल्यावर एकाच दिवशी हजारापेक्षा अधिक प्रती विक्रीचा विक्रम यापूर्वी जगविख्यात लेखिका जे. के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर या पुस्तकाने मिळवला असल्याचे किताब खाना या बुक स्टोरचे संचालक जगत प्रकाश टेकाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मराठी प्रकाशन व्यवसायात ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक असल्याचे या व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ऊर्जा क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि ‘लेट्स रीड इंडिया’ ही वाचन चळवळ सुरू करणारे वानखेडे यांचे ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ या पुरवणीतील ‘गोष्ट पैशापाण्याची’ सदर लोकप्रिय ठरले. या लेखांचा संग्रह ‘गोष्ट पैशापाण्याची’ या हॅरी पॉटरच्या विक्रमाशी बरोबरी पुस्तक रूपात येत आहे. ‘सकाळ प्रकाशन’कडून प्रकाशित होणारे पुस्तक ९ सप्टेंबरला आगावू नोंदणीसाठी खुले झाले. काही तासांतच हजारांपेक्षा जास्त प्रती वाचकांनी खरेदीसाठी नोंदविल्या. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान ते जम्मू-काश्मीरमधूनही पुस्तकाला मागणी आली.

ऑनलाईन पोर्टलवर बेस्ट सेलर

ॲमेझॉनवर नव्या पुस्तकांच्या यादीत सलग एक महिन्याभरापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा पुस्तकांच्या यादीत स्थान पटकावणारे गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रादेशिक भाषेतील एकमेव आहे. जगविख्यात पुस्तक ॲटॉमिक हॅबिट, एकिगाई या पुस्तकांच्या सोबतीने हे पुस्तक समाविष्ट आहे.

पहिली आवृत्ती ३० हजारांची

मराठी प्रकाशन व्यवसायात पुस्तकाची एक आवृत्ती साधारणतः एक हजार प्रतींची असते. मात्र ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाने हे सर्व विक्रम मोडीत काढले. चौथ्या आठवड्यात १२,६०० प्रतींचा टप्पा पुस्तकाने गाठला. पुस्तकाची पहिली आवृत्ती ३० हजार पुस्तकांची आहे. एक आवृत्ती ३० हजार प्रतींची असणे हादेखील विक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT