Gudi Padwa 2024 esakal
लाइफस्टाइल

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यानिमित्त परिधान करा खास साड्या, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स, दिसाल एकदम झकास!

Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. गुढीपाडव्यानिमित्त महिलांचा खास पारंपारिक लूक करण्यावर भर असतो

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : भारतात दरवर्षी हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरूवात ही गुढीपाडव्याच्या सणाने होते. त्यामुळे, गुढीपाडवा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. यंदा हा गुढीपाडव्याचा सण ९ एप्रिल (मंगळवारी) २०२४ देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे, सध्या सगळीकडे गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळतेय.

या गुढीपाडव्यानिमित्त महिलांचा खास पारंपारिक लूक करण्यावर भर असतो. नवारी साडी, किंवा पैठणी परिधान करण्याला महिला प्राधान्य देतात. परंतु, या व्यतिरिक्त इतर अनेक पर्याय साड्यांमध्ये उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे पर्याय? चला तर मग जाणून घेऊयात.

लाल रंगाची सिल्क साडी

लाल रंग हा कोणत्याही कार्यक्रमासाठी नेहमीच बेस्ट ठरतो. लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा एखादे फंक्शन असुद्या त्या खास प्रसंगी लाल रंगाची सिल्क साडी उठून दिसते. गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही देखील लाल रंगाची सिल्क साडी नेसू शकता.

या साडीवर छान मराठमोळे गोल्डन किंवा मोत्याचे दागिने परिधान करून आणि मिनिमल मेकअप, सुंदर हेअरस्टाईल करून तुम्ही लूक पूर्ण करू शकता. अभिनेत्री ईशा गुप्ताने या लाल रंगाच्या साडीवर मस्त लूक केला आहे. तुम्ही या प्रकारचा लूक नक्कीच ट्राय करू शकता. (Red Silk Saree)

कांजीवरम साडी

दाक्षिणात्य साड्या हा महिलांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. गुढीपाडव्याला नेहमीचा पारंपारिक लूक करून तुम्ही जर कंटाळला असाल तर तुम्ही कांजीवरम साडीचा विचार करायला काही हरकत नाही.

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाने ही सुंदर जांभळ्या आणि गोल्डन जरीची कांजीवरम साडी नेसली आहे. या प्रकारची साडी तुम्ही गुढीपाडव्याला नेसू शकता. यावर मिनिमल मेकअप, दाक्षिणात्य ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाईल करून तुम्ही लूक पूर्ण करू शकता. यासाठी तुम्ही राशीच्या लूकची मदत घेऊ शकता. (Kanjivaram saree)

पैठणी साडी

पैठणी साडीवरील महिलांचे प्रेम हे काही लपून राहिलेले नाही. प्रत्येक महिलेकडे एकतरी पैठणी साडी ही असतेच. नेहमीच्या काठपदरच्या साडीऐवजी तुम्ही गुढीपाडव्याला सुंदर पैठणी साडीचा लूक नक्कीच करू शकता.

‘महाराष्ट्राची अप्सरा’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने परिधान केलेली ही नारंगी आणि गुलाबी शेडची मुनिया पैठणी पाडव्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सोनाली या पैठणीत कमाल दिसतेय. तिच्यासारखी मोत्यांची ज्वेलरी, मिनिमल मेकअप, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोरसारखा लूक तुम्ही नक्कीच करू शकता. मग, बघा तुम्ही कशा झकास दिसाल ते. (Paithani Saree)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Rohit Sharma विरुद्ध मिचेल स्टार्कने खरंच 176.5 Kmph वेगात बॉल टाकला? जाणून घ्या सत्य काय

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या

SCROLL FOR NEXT