Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केस तुटणे अन् गळणे होईल कमी, फक्त झोपण्यापूर्वी केसांसाठी एवढंच करा

Hair Care Tips : वाढते प्रदूषण, धूळ अन् बिघडलेली जीवनशैली इत्यादी कारणांमुळे केसांच्या समस्या निर्माण होत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : दिवसेंदिवस केसांच्या समस्या वाढताना दिसत आहेत. केसगळती, अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये फाटे फुटणे, केस तुटणे इत्यादी समस्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढते प्रदूषण, धूळ अन् बिघडलेली जीवनशैली इत्यादी कारणांमुळे केसांच्या समस्या निर्माण होत आहेत. जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या उशीला चिकटलेल्या केसांचा पुंजका दिसत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. यावर तुम्ही वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

केस गळणे खर तर सामान्य आहे. परंतु, सकाळी उठल्यावर तुमच्या उशीला मोठ्या प्रमाणात केस चिकटलेले दिसत असतील तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आह. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या मदतीने तुमच्या केसांच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

झोपताना केसांची वेणी घाला

अनेक महिलांना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते. ही सवय वेळीच सोडा, कारण मोकळ्या केसांमुळे केस तुटण्याची आणि केसगळतीची शक्यता वाढते. केस तुटण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे, झोपण्यापूर्वी तुमच्या केसांची वेणी घाला. परंतु, वेणी घालताना ती जास्त घट्ट घालू नका. कारण, यामुळे केस तुटू शकतात. त्यामुळे, केसांची सैलसर वेणी घालून झोपा. यामुळे, केसगळतीला आळा बसेल.

ओल्या केसांमध्ये झोपू नका

सकाळच्या कामाच्य गडबडीमुळे महिलांना केस धुवायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे, कामावरून आल्यावर संध्याकाळी काही जणी केस धुतात. खर तर केस धुवायला काही हरकत नाही. परंतु, ओल्या केसांमध्ये झोपणे हे चुकीचे आहे. यामुळे, केस तुटू शकतात आणि डोक्यात बुरशीजन्य बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा ही धोका वाढतो. केसांच्या समस्येसोबतच आरोग्याच्या ही समस्या निर्माण होतात. त्यामुळे, ओल्या केसांमध्ये झोपणे टाळा.

कॉटनच्या उशीला करा बाय

सूती अर्थात कॉटनचे कपडे शरीरासाठी आरामदायक मानले जातात. खास करून उन्हाळ्यात कॉटनचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु, सूती कापडाची किंवा कॉटनची उशी तुमच्या केसांचा ओलावा कमी करू शकते. या उशीवर झोपल्यामुळे केस जास्त प्रमाणात घासले जातात. त्यामुळे, कॉटनची उशी वापरण्याऐवजी सॅटिन कापडाची उशी वापरा. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News:'साेलापुरमधील गोसेवा यज्ञाद्वारे २ हजार गायी-वासरांना जीवदान'; ४२ गोशाळांमध्ये आज साजरी होणार वसुबारस

Ration shops In Kolhapur : सर्व्हर डाउनमुळे थांबले धान्य वाटप, ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ; रेशनकार्ड दुरुस्तीची कामेही रखडली

Education News: एमपीएससी’ अन् ‘नेट’ एकाच दिवशी दोन्ही परीक्षा; चार जानेवारी २०२६ ला आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update : आज फडणवीस बिहार दौऱ्यावर

Rickshaw Driver Honesty: 'प्रवाशाचा लॅपटॉप परत करत रिक्षाचालकाने दिले माणुसकीचे दर्शन'; रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

SCROLL FOR NEXT