Hair Fall esakal
लाइफस्टाइल

Hair Fall : घरी सर्वत्र गळलेले केस दिसताय? केस गळती थांबवण्यासाठी शाम्पू करण्याआधी लावा घरगुती हेअर पॅक

हेल्दी, सिल्की आणि मजबूत केसांसाठी घरी हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Hair Fall : केसांची योग्य काळजी घेतली नाही की केस गळतीची समस्या वाढते. मान्सूनमध्ये केस गळणे साहाजिक आहे मात्र कायम आणि मोठ्या प्रमाणात केसगळती होत असेल तर ती चिंतेची बाब आहे. केस गळती थांबवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या वेगवेगळ्या हेअर मास्कचा वापर करू शकता. चला तर मग हेल्दी, सिल्की आणि मजबूत केसांसाठी घरी हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

तुमचे केस घरातील प्रत्येक कोपऱ्यात पडलेले तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही तांदळाचे पाणी, मध आणि नारळाचे तेल व अॅलोव्हेरा जेलपासून हेअर मास्क बनवू शकता.

हेअर मास्क कसे बनवाल?

वरील हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करा. या सगळ्या गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या आणि एक स्मूद हेअर मास्क तयार करा.

यापद्धतीने लावा हेअर मास्क

हा हेअर मास्क लावण्यासाठी केसांचे समान पार्टेशन करा. आता हेअर मास्क केसांच्या मुळापर्यंत लावायला सुरुवात करा. हेअर मास्क सगळीकडे नीट लावल्यानंतर केसांची हाताने मालिश करा. शाम्पूआधी हा पॅक कमीत कमी ३० मिनिटांसाठी लावा. (Hair Care)

केसांच्या वाढीसाठी आणि त्यांना आतून पोषण देण्यासाठी हे हेअरमास्क अत्यंत फायदेशीर ठरेल. हे बनवण्यासही फार सोपे आहे. तेव्हा तुम्हीही केसगळतीने त्रस्त असाल तर हा हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT