Afternoon Nap Esakal
लाइफस्टाइल

Afternoon Sleep कंट्रोल होत नाही, काय आहे कारण? या आजारांचा धोका

रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी चांगली एक दोन तास झोप घेण्याची अनेकांना सवय असतेय मात्र जर तुम्ही दररोज दुपारच्या जेवणानंतर दोन तीन तास झोपत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं

Kirti Wadkar

रात्री जेवल्यानंतर झोपणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र अनेक जणांना दुपारच्या जेवणानंतर Afternoon Meal झोपण्याची सवय असते. गृहिणी असो किंवा नोकरदार महिला अनेकींना दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ लागते.

डोळ्यांच्या पापण्या आपोआप बंद होऊ लागतात. यावेळी एखादी छोटीशी झोप काढणं ही वाईट गोष्ट नव्हे. Health Tips in Marathi Ill Effects of Afternoon Sleep

२० मिनिटांची झोप Sleep घेणं हे उलट आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मात्र जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर Meal दोन तीन तासांची झोप लागत असेल आणि तुम्हाला सुस्ती जाणवत असेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. 

रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी चांगली एक दोन तास झोप घेण्याची अनेकांना सवय असतेय मात्र जर तुम्ही दररोज दुपारच्या जेवणानंतर दोन तीन तास झोपत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. 

दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप कंट्रोल होत नसेल किंवा एखादी पावर नॅप तुम्हाला पुरेशी नसेल याचा अर्थ तुम्हाला आरोग्याच्या काही समस्यांनी ग्रासल आहे. दुपारच्या जेवणानंतर झोप येण्यामागे नेमकी काय कारण आहे हे पाहूयात.

हे देखिल वाचा-

हार्मोन असू शकतं कारणं

जेव्हा आपण काही खातो तेव्हा रक्तातील सारख नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचा हार्मोन बाहेर पडून सक्रिय होतो. आपण जेवढा जड आहार घेतो तेवढचं जास्त इंन्सुलिन बाहेर पडतं.यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता वाढते. 

इन्सुलिनचं प्रमाण वाढल्याने आपल्या शरीरात झोपेचे हार्मोन्स तयार होतात. जे आपल्या मेंदूतील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाच्या हार्मोन्समध्ये रुपांतरीत होतात.

यातील सेरोटोनिनला ‘फिल गुड हार्मोन’ म्हंटलं जातं. या हार्मोन्सचा थेट संबध आपल्या झोपेशी असतो. जेवल्यानंतर शरीरात सेरोटोनिन हार्मोन्स वाढल्यामुळे आपल्याला झोप येऊ लागते. Side effects of sleeping after lunch

जास्त कॅलरीयुक्त आहाराने येते झोप

दुपारच्या जेवणात जास्त कॅलरीज असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास देखील झोप येऊ शकते. प्रोटीन असलेल्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफैन नावाचं केमिकल आढळतं. हे केमिकल आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. मात्र शरीरात या केमिकलचं प्रमाण वाढल्यास झोप येऊ लागते.

आयुर्वेदानुसार दुपारी जेवल्यानंतर झोपल्याने अनेक आजार जडण्याची शक्यता असते.आयुर्वेदानुसार दुपारच्या जेवणानंतर झोपल्याने शरीरात स्निग्ध गुणांच प्रमाण वाढतं.

यामुळे शरीरात कफदोष निर्माण होण्याची शक्यता वाढते. पचनक्रियेदरम्यान कफ दोष नैसर्गिकरित्या जास्त असतो. अशा स्थितीत आपण झोपलो तर पोटाचे विकार होवू शकतात.

याचसोबत दुपारी जेवल्यानंतर झोपल्याने डोकेदुखी, शरीरात जडपणास पचन शक्ती मंदावणे तसचं मज्जातंतूच्या कार्यात अडथळा अशा समस्या निर्माण होवू शकतात. 

तसचं जास्त वनज असलेल्यांनी दुपारी झोपू नये असं तज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. 

हे देखिल वाचा-

दुपारची झोप टाळा

दुपारच्या झोपण्यामुळे कफदोष वाढतो. त्यामुळेच दुपारी झोपणं टाळावं. दुपारच्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही काही इतर गोष्टींमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.

यासाठी तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता किंवा ऑडिओ बुक ऐकू शकता. काही गाणी ऐकू शकता. मात्र अशावेळी तुमचा उत्साह वाढेल अशी गाणी एका. सॉफ्ट म्युझिक ऐकू नका. 

तसचं तुम्हाला एखादा छंद असले तर त्यासाठी वेळ द्या. जसं कुकिंग, क्राफिटिंग किंवा पेंटिग. यावेळेत तुम्ही एखादी वेब सीरिजही बघू शकता. एकंदर एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्वत:ला गुतवून दुपारची झोप टाळणं गरजेचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT