watermelon  sakal
लाइफस्टाइल

Health Tips: टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

तुम्हीही टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता का?

Aishwarya Musale

उष्णता टाळण्यासाठी, स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, पाण्याव्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेट राहू शकते. फळांबद्दल बोलायचे झाले तर टरबूजमध्ये सर्वाधिक पाणी आढळते.

टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात आंब्यानंतर खाल्ले जाणारे हे दुसरे फळ आहे. टरबूजला अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत मानला जातो, परंतु त्याच्या सर्व चांगुलपणानंतर, काही वाईट गोष्टी देखील आहेत. असे अनेक लोक म्हणतात की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. चला तर, टरबूज खाल्ल्यानंतर खरंच पाणी प्यायला हवं का, हे आज आरोग्य तज्ज्ञ डॉ. अजय यांच्याकडून जाणून घेऊया.

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यावे का?

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर परिणाम होऊ शकतो. टरबूजमध्ये पाणी, साखर आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. काही आरोग्य तज्ञ म्हणतात की सूक्ष्मजंतू आणि जीवाणूंना वाढण्यासाठी पाणी आणि साखर आवश्यक आहे. आता टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये पसरण्याची शक्यता असते.

मात्र, दिल्लीचे जनरल फिजिशियन डॉ. अजय सांगतात की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही, ते तापमानावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही बाहेर ठेवलेले टरबूज खात असाल आणि नंतर थंड पाणी पीत असाल तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवलेले टरबूज खाल्ल्यानंतर कोमट पाणी पिण्याचेही तोटे आहेत.

पाणी कधी प्यावे?

टरबूज खाल्ल्यानंतर किती वेळ पाणी प्यावे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. डॉ. अजय सांगतात की टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्यानंतर लवकर तहान लागत नाही. ते खाल्ल्यानंतर एक तासानंतर पाणी पिता येते. टरबूज खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात लिक्विड घेतल्यास अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT