Healthy Breakfast esakal
लाइफस्टाइल

Healthy Breakfast: नाश्ता करायला वेळ नाही तर प्रवासात सोबत घ्या हे छोटे पदार्थ, देतील वेगळीच एनर्जी

हाडे मजबूत करणारा देखील एक मासा आहे, त्याचं नाव तुम्हाला माहितीय का?

Pooja Karande-Kadam

Healthy Breakfast: नाश्ता हे दिवसाचे सर्वात महत्वाचे फूड आहे. असे म्हटले सकाळचा नाश्ता पोटभर असावा, ज्यामुळे आपल्याला दिवसभर उर्जा मिळते. नाश्ता फक्त पोट भरणारा नाहीतर, तो आरोग्यदायी असावा जेणेकरून शरीराला पूर्ण पोषण मिळू शकेल. पण, आजकाल कोणीही शांतपणे बसून नाश्ता करताना दिसत नाही.

मॉर्निंग वॉकनंतर केलेला नाश्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. फिरल्यानंतर निरोगी आणि पौष्टिक नाश्ता केल्याने हृदयाबरोबरच हाडेही मजबूत होतात. हे जरी खरं असलं तरी, ऑफिसला पोहोचायची घाई असते, हातात कामं असतात. ज्यामुळे नाश्ता करायला वेळ मिळत नाही.

तुमचं वय आता ३० असेल तर तुम्ही आतापासूनच काही पदार्थ खायला सुरू करायला हवंय. ज्यामुळे चाळीशीनंतर होणाऱ्या अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.  आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास तुम्हाला पूर्ण पोषण मिळते. (5 important foods for bone health)  

हे पदार्थ नाश्ता म्हणून नाहीतर एक प्रकारचे औषध आहे म्हणून सेवन करा. हे पदार्थ तुम्ही प्रवासातही खाऊ शकता. जे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतील.

ऍवोकॅडो

तुम्ही काही दिवस ऍवोकॅडो हे फळ खा आणि त्यानंतर शरीरात होणारा फरक पहा. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या अंगदुखी पळून गेलीय, अन् सांधेदुखीमुळे जो काही त्रास होता तो सगळा पळून गेलाय. ही जादू फक्त ऍवोकॅडोने केलेली असेल. ऍवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.त्यामध्ये पोटॅशियम देखील आढळते, जे रक्त दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

अंडी

लहान मुलांसाठी अंड चांगलं असतं असं म्हणतात. कारण, अंड्यात असलेले कॅल्शियम हाडांची काळजी घेते. अंड्यांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक मानले जाते, ज्यामुळे हाडे देखील मजबूत होतात.

मल्टी ग्रेन ब्रेड

तुम्ही ब्रेड खाऊनही हाडे मजबूत बनवू शकता. खरंच, फक्त तो ब्रेड साधा मैद्याचा नाहीतर मल्टी ग्रेन असावा. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनसंस्थेसाठी तसेच हृदयासाठी खूप फायदेशीर असते. तुम्हाला नाश्त्याला वेळ नसेल तेव्हा प्रवासात या ब्रेडचे सँडविच सोबत घ्याल तर पोटही भरलेले राहील आणि हाडेही मजबूत होतील.

भाज्या आणि वटाणे

लहानपणापासून तुम्ही पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत असं ऐकत आला असाल. तर, पालक, लाल माठ यांसारख्या भाज्यांमध्ये पोषक तत्व असतात. तुम्ही आहारात त्याचा समावेश करू शकता. तर, प्रवासात काळे वटाणे, भिजवलेले हरभरे सोबत घेऊ शकता.

हे तुमच्या हाडांना अधिक ताकदवान बनवण्यात फायदेशीर ठरते. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. यामध्ये कमी कॅलरी सामग्री आहे, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

नकोशा असलेल्या पालेभाज्या फायदेशीर आहेत

फळे आणि सुका मेवा

तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्स यासारख्या पदार्थांचा समावेश करा, त्यामध्ये फायबर, फॅट्स आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे उतरत्या वयात तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतील. गुढगे दुखीवरही ते सकारात्मक फरक पाडते.

बेरी

बेरीजची चव थोडी आंबट असली तरी त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादींमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे हृदय तसेच हाडे निरोगी राहतात.

वेळ मिळेल तेव्हा खा हा पदार्थ

सॅल्मन मासे

सॅल्मन मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडमध्ये भरपूर असतात. जे हृदयविकाराच्या धोक्यापासून शरीराचे रक्षण करते आणि हाडे देखील मजबूत करतात.

सॅल्मन मासे हाडे मजबूत करतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT