History of Touchwood Sakal
लाइफस्टाइल

History of Touchwood : तरूणांकडून नेहमी उच्चरला जाणारा 'टचवुड' शब्द कुठून आला? असा आहे इतिहास

अनेकदा तुम्ही लोकांच्या चर्चांमध्ये विविध शद्बप्रयोग ऐकत असतो.

सकाळ डिजिटल टीम

Why People Say Touchwood : अनेकदा तुम्ही लोकांच्या चर्चांमध्ये विविध शद्बप्रयोग ऐकत असतो. ते ऐकून नेमका हा शब्द कुठून आणि त्याचा अर्थ नेमका काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यातीलच एक नेहमी कानावर पडणारा शब्द म्हणजे टचवूड. हा शब्दप्रयोग साधारणतः लाकडाला स्पर्श करून उच्चारला जातो.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आज आम्ही तुम्हाला याच शब्दाबद्दल माहिती सांगणार आहोत. हा शब्द नेमका कुठून आला त्या मागचा इतिहास काय आणि अजून बरचं काही ज्यामुळे तुम्हाला या शब्दाबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

काय आहे मान्यता?

जगात अशा अनेक ऐतिहासिक समजुती आहेत. त्यातील एक समजूत म्हणजे झाडांवर परी, आत्मे आणि इतर पौराणिक प्राण्यांचे घर होते. त्यामुळे लाकूड दोनदा ठोठावण्याची परंपरा होती. त्यापैकी पहिल्या ठोठावण्यावेळी झाडाला इच्छा सांगणे आणि दुसरे आभार मानणे असे आहे.

याशिवाय जगातील अनेक भागांतील लोक वृक्षांची पूजा करतात असे करण्यामागे देवाचे निवासस्थान अशी मान्यता आहे. यामुळेच लाकडाला स्पर्श केल्याने सौभाग्य प्राप्त होते असा विश्वास वरील मान्यतांवरून निर्माण झाला.

अतिशय मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्ही जगाच्या कोणत्या भागातून आहात किंवा तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता याने काही फरक पडत नाही. टचवूड सारखे वाक्प्रचार सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

अनेक देशांमध्ये आहेत विविध शब्द

टचवूड सारख्या शब्दांसारखे शब्द उच्चारणे विविध देशांत आहे. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये एक Bater Na Madeira, ज्याचा अर्थ टचवुड सारखाच आहे. त्याच वेळी, इंडोनेशियातील अमित-अमित या वाक्प्रचाराचा अर्थ देखील समान आहे. तर इराणमध्ये लोक बेजानम बी तचते वापरतात. ग्रीसमध्ये, एक म्हण आहे ज्याचा शाब्दिक अर्थ लाकडावर ठोठावणे आहे आणि जेव्हा लोक काहीतरी नकारात्मक ऐकतात त्यावेळी ती घटना घडू नये असे त्यांना वाटते त्यावेळी येथील लोक या म्हणीचा उपयोग करतात.

शेवटी सार टचवूड या शब्दांचा अर्थ असाच आहे आणि तो म्हणजे कोणत्याही नकारात्मक भावनांपासून (इर्ष्या आणि राग) सावध राहणे आणि भविष्यासाठी आपल्या आशा आणि इच्छांचे रक्षण करणे होय. त्यामुळे टचवुड शब्दाने शतकानुशतके खूप लांबचा पल्ला गाठला आहे आणि आधूनिक जगातही त्याचा त्याच पद्धतीने वापर केला जातो हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT