Home Tips esakal
लाइफस्टाइल

Home Tips : घरात झुरळांनी वैतागले आहात? करून बघा 'हे' सोपे उपाय

झुरळांपासून (Cockroach) मूक्तता हवी असेल तर हे उपाय तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही हे उपाय केलेत तर घरात आणि किचनमध्ये झुरळ उरणार नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

किचनमध्ये झुरळ आढळणे ही चांगली गोष्ट नाही कारण ते ड्रेनेजपासून जेवणापर्यंत सगळीकडे फिरत असतात. यामुळेत घरात आजारपण येतात. जर तुमच्या घरात झुरळं असतील तर तुम्ही सावधान व्हायला हवे. तुम्हाला चिंतीत होण्याची गरज नाही. कारण या बातमीत आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुम्ही सहज करू शकतात आणि झुरळांच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतात.

रॉकेलने घालवू शकतात झुरळं

झुरळं पळवण्यासाठी रॉकेलचा वापर उपयुक्त ठरतो. घरात जिथे झुरळं सगळ्यात जास्त दिसतात त्या जागा शोधा. तिथे रॉकेलचा स्प्रे मारा. त्या वासाने झुरळं पळून जातील. हा स्प्रे करताना त्वचा झाकलेली असावी.

कडूलिंब देते झुरळांपासून मुक्ती

कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहितीच असेल. त्याचा एक मोठा फायदा झुरळं घालवण्यासाठीही आहे. कडूलिंबाचा पाला पाण्यात उकळवून त्या पाण्याला झुरळांच्या जागी शिंपडावे. या उपायाने झुरळं निघून जातील.

बेकींग सोड्याचाही फार उपयोग

झुरळं घालवण्यासाठी बेकींग सोडा फार उपयुक्त आहे. त्यात साखर मिक्स करून त्याचे मिश्रण बनवा. जिथे झुरळं जास्त येतात तिथे हे मिश्रण टाकावे. साखरेने झुरळं तिथे आकर्षित होतील आणि बेकींग सोड्यासोबतचे त्याचे मिश्रण झुरळांसाठी विष ठरेल आणि झुरळं मरून जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT