लाइफस्टाइल

स्टीमनंतर 'इंस्टेंट ग्लो' मिळविण्यासाठी ट्राय करा होममेड फेस पॅक

अर्चना बनगे

कोल्हापूर: स्टीम घेतल्यानंतर आपण या फेस पॅकला वापरुन पाहू शकता. इन्स्टंट ग्लो आणि रंग सुधारण्यासाठी हे फेस पॅक सर्वोत्तम आहेत. ब्यूटी केयर रूटीनमध्ये (Beauty care Routine)फेशियल महत्वाचे आहे. परंतु यासाठी आपण पार्लरमध्ये जाणे आवश्यक नाही. आता फेशियल (Home Made Facials) घरी देखील करता येते. परंतु हे करत असताना स्टीम घेणे देखील आवश्यक आहे. यामुळे आपल्या त्वचेचे रक्ताभिसरण वाढते आणि आपल्या चेहऱ्यावरील छिद्र उघडते. जेणेकरून त्वचेच्या छिद्रांमधील घाण काढून टाकता येते. म्हणून फेशियल रूटीन (Facial routine)मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. म्हणून स्टीम घेतल्यानंतर चेहऱ्यावर फेसपॅक लावतात.

Homemade Face Pack to get instant glow after steam tips marathi news

इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी अशी अनेक फेसपॅक आहेत, जे स्टीम घेतल्यानंतर आपण चेहऱ्यावर लावू शकता. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे होममेड फेस पॅक अतिशय प्रभावी आहे. स्टीम घेतल्यानंतर आपला चेहरा पुसून टाका, मग आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसपॅक लावा.

मुलतानी माती सामग्री

साहित्य

मुलतानी माती - 1 चमचा

हळद - 1 चिमूटभर

मध - 1/2 चमचा

कोरफड जेल - 1 चमचा

लिंबाचा रस - 2 थेंब

पद्धत

मुलतानी मातीपासून बनवलेला फेस पॅक प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी परिपूर्ण मानला जातो. परंतु त्यात वापरलेले इंग्रेडिएंट्स महत्वाचे आहेत.

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मुलतानी मातीमध्ये मध वापरा. तेलकट असल्यास कोरफड वापरा.आता आपल्या त्वचेनुसार हळद, लिंबाचा रस आणि इतर साहित्य मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि 15 मिनिटे सोडा. 15 मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ करा. हा फेस पॅक सोपा आणि प्रभावी आहे.

मध आणि लिंबू फेस पॅक

साहित्य

मध - 2 ते 3 चमचे

लिंबाचा रस - 2 चमचे

पद्धत

इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी मध आणि लिंबूपासून बनविलेले फेसपॅक खूप प्रभावी आहे.

यासाठी या दोन्ही घटकांचे चांगले मिश्रण झाल्यावर ते आपल्या चेहऱ्यावर लावा.

फेस पॅक लावल्यानंतर साधारण अर्ध्या तासासाठी सोडा, नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा.

जर तुम्हाला त्वचा कोरडी वाटत असेल तर काही वेळाने हलकी मलई वापरा.

ओट्सपासून बनवा फेसपॅक

साहित्य

ओट्स - 2 चमचे

मध - 1 चमचा

गुलाब पाणी - 2 ते 3 चमचे

दूध - 2 ते 3 चमचे

पद्धत

ओट्सचा फेसपॅक तयार करण्यासाठी प्रथम ओट्सला थोड्या वेळासाठी भिजवा जेणेकरून ते चेहऱ्यावर टिकून राहील.

आता ओट्समध्ये मध मिसळा. ओट्सचा फेसपॅक करण्यासाठी आपण दूध किंवा गुलाबपाणी या दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकता.

जर त्वचा कोरडी असेल तर दुधाचा वापर करा. जर त्वचा तेलकट असेल तर गुलाब पाणी वापरा.आता हे फेसपॅक चांगले मिसळल्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ करा.

अँटी-एजिंग आणि सुरकुत्यासारख्या त्वचेच्या जळजळांपासून मुक्त होण्यासाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर आहे.

टोमॅटो आणि फेस पॅक

साहित्य

टोमॅटो - 1

दही - 1 किंवा 2 चमचे

मध - 1 चमचे

पद्धत

स्टीम घेतल्यानंतर आपण दही आणि टोमॅटोचे बनलेले हे फेस पॅक लावू शकता.

हे लक्षात ठेवा की आपल्या त्वचेवर थेट दही वापरू नका, यामुळे एलर्जी होऊ शकते.

अशा परिस्थितीत टोमॅटोचा रस आणि मध दहीमध्ये मिसळा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा.15 से 20 मिनिटे लावल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

त्याच वेळी चेहरा स्क्रब करण्यासाठी आपण अर्धा टोमॅटो वापरू शकता. रंग वाढविण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT