women investment google
लाइफस्टाइल

ओ वुमनिया, बक्कळ कमावतेस मग, गुंतवणूक कर की जरा!

भक्ती सोमण-गोखले

आता बायका पुरूषांच्या बरोबरीने कमावू लागल्या आहेत. घर, मुलांचे बघणे, स्वयंपाक, ऑफीस यात तिची तारांबळ उडते. पण ऑफीसमध्ये केलेल्या कष्टाचं चीज म्हणजे पगार मिळाल्यावर त्यांना हायस वाटतं. अर्थात आजच्या युगात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे. पण मिळालेला पगारातला काही भाग हा योग्य ठिकाणी गुंतविणे गरजेचे आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करता तेव्हा त्याचा परतावा चांगला मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या पैशांचा मोठा फायदा होईल.

Investment

महिलांनी गुंतवणूक का सुरू करावी ?

नवरा, वडिल किंवा मुलगा पैसे गुंतवतो म्हणून तुम्हीही करता, असा सोपा मार्ग म्हणून गुंतवणूकीकडे बघू नका. पण अगदी स्पष्टपणे सांगायते तर, गुंतवणूक हा महिलांसाठी त्यांच्या उत्पन्न वाढविण्याचा महत्वाचा मार्ग आहे. जर, एखादी स्त्री काम करत असल्यास, ती दर महिन्याला तिच्या काही उत्पन्न इतर ठिकाणी खर्च करते. पण त्यातला काही भाग हा गुंतवणे गरजेचे आहे, तो शेअर मार्केटमधे पण ठेवता येईल. असे केल्याने तुम्ही बर्‍याच गोष्टींसाठी बचत करू शकते. तुम्ही विविध कामांचे पैसे वाचविले आहेत. ते अतिरिक्त पैसे गुंतवा. पण, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी स्त्रीला काम करण्याची गरज नाही. काही स्त्रिया कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घरी राहतात. अशावेळी तुमच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी पैसे मिळवण्यासाठी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक चांगली गोष्ट आहे:.

investment

गुंतवणूक कधी सुरू करावी?

कोणत्या वयात स्त्रीने गुंतवणूक सुरू करावी? पहिली नोकरी उतरता तेव्हा का? कदाचित तुम्ही पहिल्यांदा थोडे पैसे कमवायला सुरुवात करता तेव्हा? की प्रमोशन मिळाल्यावर? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. खरे सांगायचे तर तुम्ही अगदी कधीही पैसे गुंतवू शकता. खरे सांगायचे तर स्त्रियांना त्यांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी उत्तेजन दिले अशतो तर त्या अधिक सशक्त झाल्या असत्या. किंबहुना व्यवसायाच्या वातावरणात त्यांनी अधिक सक्षम प्रतिनिधित्व केले असते. अनेक स्त्रिया नशीबवान आहेत की त्यांना उच्च परतावा देणारी गुंतवणूक साधने सापडली आहेत. पण जर नव्याने गुंतवणूक करायची असेल तर सर्व ठिकाणी लगेच पैसा गुंतवणे योग्य नाही, गुंतवणूकीचा विचार करताना काही मार्ग कमी आव्हानात्मक असतात. त्यांचा विचार करावा. सुरवातीला त्रास होईल किंवा अधिक पैसे खर्च होतील, असे काही करू नका.

investment tips for women

महिलांसाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक अधिक चांगली

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करण्यास सुरवात करणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम परतावा RoI (गुंतवणुकीवर परतावा) मिळण्यास मदत होईल. महिलांवर घरातील जबाबदाऱ्या असतात. तसेच ऑफिसची आघाडीही त्या सांभाळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी दररोज किंवा साप्ताहिक आर्थिक पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करणे आव्हानात्मक होऊ शकते.

तर दुसरीकडे महिलांना त्यांचा पोर्टफोलिओ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचा असल्याचे लक्षात येते. पण गुंतवणूकीचे दोनपोर्टफोलिओ सारखे नसतात. त्यामुळे तुम्ही त्यासाठी किती वेळ देऊ शकता, ते पाहणे महत्वाचे आहे. त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणूक पर्यायांवर होऊ शकतो. म्हणूनच महिलांच्या गुंतवणूकीसाठी काही पर्याय त्यांना फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT