guide to liquor expiry dates and storage tips esakal
लाइफस्टाइल

Liquor Expiry : दारूची एक्सपायरी डेट किती असते? बाटली उघडल्यानंतर किती काळ टिकते, जाणून घ्या

liquor expiry dates and storage tips : दारूच्या एक्सपायरी डेट आणि साठवणुकीबाबत माहिती जाणून घ्या.

Saisimran Ghashi

  • व्हिस्की, व्होडका, रम यांसारख्या उच्च अल्कोहोलयुक्त दारू सीलबंद असल्यास कधीच खराब होत नाहीत.

  • वाइन ५-६ दिवसांत, तर बिअर काही तासांत उघडल्यानंतर खराब होऊ शकते.

  • दारू थंड, अंधाऱ्या जागी साठवल्यास तिची चव आणि गुणवत्ता जास्त काळ टिकते.

दारूच्या शौकीनांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही व्हिस्की, व्होडका, रम किंवा वाइन यापैकी काहीही पित असाल, तर तुम्हाला तुमच्या आवडत्या पेयाची एक्सपायरी डेट आणि साठवणुकीच्या योग्य पद्धती माहीत असणं गरजेचं आहे. दारूच्या बाटलीचं झाकण उघडल्यानंतर ती किती दिवस पिण्यायोग्य राहते? तिची चव आणि गुणवत्ता कशी टिकवावी? याबाबत तज्ज्ञांचं मत आणि काही खास टिप्स आज आपण जाणून घेऊया

अल्कोहोलचं प्रमाण ठरवतं आयुष्यकॉकटेल इंडियाचे संस्थापक आणि प्रसिद्ध बारटेंडर संजय घोष यांच्या मते, दारूची एक्सपायरी डेट ही तिच्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते. व्हिस्की, व्होडका, रम, जिन आणि टकीला यांसारख्या उच्च अल्कोहोलयुक्त (स्पिरिट्स) दारू जर सीलबंद बाटलीत आणि योग्य पद्धतीने साठवल्या तर त्या कधीच खराब होत नाहीत. याउलट, वाइन आणि बिअर यांच्यात अल्कोहोलचं प्रमाण तुलनेने कमी असल्याने त्या लवकर खराब होतात.व्हिस्की, व्होडका किंवा रम यांसारख्या दारूंमध्ये अल्कोहोलचं प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असतं. यामुळे या दारू बॅक्टेरिया आणि ऑक्सिडेशनपासून सुरक्षित राहतात. परंतु, वाइनमध्ये साधारण १२ ते १५ टक्के आणि बिअरमध्ये ४ ते ८ टक्के अल्कोहोल असतं.

कमी अल्कोहोलमुळे या पेयांना ऑक्सिडेशनचा धोका अधिक असतो, ज्यामुळे त्यांची चव आणि गुणवत्ता लवकर बिघडते. वाइन आणि बिअरच्या बाटल्या उघडल्यानंतर त्यांची चव आणि गुणवत्ता काही काळातच खराब होऊ लागते. तज्ज्ञांच्या मते, वाइनची बाटली उघडल्यानंतर ती फक्त ५ ते ६ दिवस पिण्यायोग्य राहते. त्यानंतर तिची चव बदलते आणि ती खराब होऊ शकते. बिअरच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी नाजूक आहे. बिअरची बाटली किंवा कॅन उघडल्यानंतर काही तासांतच ती ऑक्सिडाइज होऊन चव गमावते.

त्यामुळे बिअर शक्यतो उघडल्यानंतर लगेच प्यावी.व्हिस्की, रम, व्होडका: उघडल्यानंतरही टिकतात, पण...उच्च अल्कोहोलयुक्त दारू जसे की व्हिस्की, रम, जिन किंवा व्होडका यांच्या बाटल्या उघडल्यानंतरही त्या खराब होत नाहीत. मात्र, या दारूंची चव कालांतराने बदलू शकते. संजय घोष सांगतात, "बाटली उघडल्यानंतर हवेच्या संपर्कामुळे दारू ऑक्सिडाइज होऊ लागते. विशेषतः जर बाटली अर्धी रिकामी असेल, तर हवेचा प्रभाव अधिक जाणवतो. त्यामुळे अशा दारूंची बाटली उघडल्यानंतर जास्तीत जास्त एक वर्षात संपवावी." जर बाटली अर्धी रिकामी असेल, तर ऑक्सिडेशनमुळे तिच्या चवीवर परिणाम होऊ शकतो.

FAQs

  1. Does whiskey expire after opening the bottle?
    व्हिस्कीची बाटली उघडल्यानंतर ती खराब होते का?

    व्हिस्कीची बाटली उघडल्यानंतर ती खराब होत नाही, पण हवेच्या संपर्कामुळे तिची चव एक वर्षानंतर बदलू शकते. त्यामुळे ती एक वर्षात संपवावी.

  2. How long does wine last after opening?
    वाइनची बाटली उघडल्यानंतर ती किती काळ टिकते?

    वाइनची बाटली उघडल्यानंतर ती फक्त ५ ते ६ दिवस पिण्यायोग्य राहते, त्यानंतर ती खराब होऊ शकते.

  3. Why does beer go bad so quickly?

    बिअर इतक्या लवकर खराब का होते?
    बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे ती हवेच्या संपर्कात आल्यावर ऑक्सिडाइज होऊन काही तासांतच चव गमावते.

  4. How should I store liquor to maintain its quality?
    दारूची गुणवत्ता टिकवण्यासाठी ती कशी साठवावी?

    दारू थंड, अंधाऱ्या जागी साठवावी, बाटली सरळ ठेवावी आणि उघडल्यानंतर झाकण घट्ट बंद करावं.

  5. Can vodka or rum expire if unopened?
    व्होडका किंवा रमची सीलबंद बाटली खराब होऊ शकते का?

    सीलबंद व्होडका किंवा रम कधीच खराब होत नाही, जर ती योग्य पद्धतीने साठवली असेल तर ती अनेक वर्षं टिकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT