How To Get Rid of Mosquitoes  sakal
लाइफस्टाइल

How To Get Rid of Mosquitoes : हे पाच घरगुती उपाय ट्राय करा, घरात एकही डास दिसणार नाही

आज आपण या डासांपासून सावध राहण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

How To Get Rid of Mosquitoes : जर तुमच्या बालकनीत, अंगणात किंवा घरात डास येत असतील तर ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी. उन्हाळा सुरू होताच डासांची संख्या वाढत असते ज्यामुळे डेंगूसारख्या आजारांचा धोका वाढतो.

अशात स्वत:ला आणि स्वत:च्या कुटूंबाला सुरक्षित कसं ठेवायचं हा प्रयत्न प्रत्येकजण करतात. आज आपण या डासांपासून सावध राहण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (How To Get Rid of Mosquitoes try these home remedies )

घरगुती उपाय 
लसूण

लसूण हे डास पळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही लसूणच्या 2-3 कळ्या बारीक करुन 1 ग्लास पाणीमध्ये उकळायचं. यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करायचं. सायंकाळी लसूणचं पाणी घरात सर्वत्र स्प्रे करायंच.

सोयाबीन ऑईल-
सोयाबीन ऑईलच्या मदतीने डासांना तुम्ही पळवू शकता. हा उपाय करण्यासाठी 5 ते 7 कापूस बॉलला घेऊन सोयाबीनचं तेल लावा त्यानंतर कापसाचे बॉलला घेऊन घरातील कोपऱ्यात ठेवावे. या वासाने घरातील डास पळतील.

कापूर-
डास पळवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी रुमध्ये 15-20 मिनिटे कापूर जाळा. असं केल्याने डास लगेच पळतील.

कॉफी स्प्रे-
डासांना पळवण्यासाठी एक स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरुन त्यात 1 चम्मच कॉफी टाका आणि घरात स्प्रे करा यामुळे तुम्हाला डासांपासून सुटका मिळणार.

पुदीना ऑइल-
खूप कमी लोकांना या गोष्टी माहिती आहे की डासांना पुदीन्याचा सुगंध आवडत नाही. अशात डासांना पळवण्यासाठी पुदीन्याचे तेल तुम्ही घरात स्प्रे करा. याशिवाय तुम्ही पुदीन्याचे काही पाने घरात वेगवेगळ्या भागात ठेवा, यामुळे डास पळतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT