Wife Anger
Wife Anger sakal
लाइफस्टाइल

Wife Anger : बायकोचा राग आउट ऑफ कंट्रोल असेल तर कसा कराल हँडल?

सकाळ डिजिटल टीम

Couple Relationship Tips : नवरा बायकोचं नातं हे खूप वेगळं असतं. सुरवातीला एकमेकांना अनोळखी वाटणारे नंतर मात्र त्याचं नातं अधिक घट्ट होत जातं. कारण दोघांनाही एकमेकांचा स्वभाव कळायला लागतो. नात्यात थोटं प्रेम किंवा थोडी रुसवा फुगवी असेल तर नातं अधिक खुलून उठतं.

अशात नात्यात कधीकधी पार्टनरला रागही येतो. अनेकदा नवऱ्याचा राग बायका खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात पण जेव्हा बायकांना राग येतो तेव्हा त्यांचा राग हँडल करणे, प्रत्येक नवऱ्याला जमत नाही.

अशावेळी काही खास टिप्स ट्राय करुन तुम्ही बायकोचा राग हँँडल करू शकता. चला तर जाणून घेऊया. (how to handle out of control wife anger read story )

  • अनेकदा नवरा बायकोच्या सर्व अपेक्षा पुर्ण करू शकत नाही. ज्यामुळे पत्नीला राग येणे स्वाभाविक असते. त्यामुळे महिलांचा आदर करा. त्यांना जर राग आला तर त्यांचा राग व्यवस्थित हँडल करा. त्यांचा भावनांचा आदर करा.

    जर पत्नी रागात असेल आणि तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलत असाल तर त्यांचा राग शांत होऊ शकतो.

  • पार्टनरचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस याशिवाय कोणताही स्पेशल दिवस किंवा डेट कधीच विसरू नका. हा पत्नीच्या रागाला हँडल करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे.

    जर नवरा चुकून स्पेशल दिवस विसरत असेल तर पत्नीला राग येणारच. त्यामुळे पत्नीला या कारणामुळे राग येणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • कधी कधी कारण नसताना पत्नीला गीफ्ट द्यावे. सरप्राईज गीफ्ट बघून ती राग विसरू शकते.

  • जर तुम्ही कोणताही लहान मोठा निर्णय घेत असाल तर पत्नीला विचारा. तिचं मत जाणून घ्या. जर तुम्ही असं करत नसाल तर नक्कीच तुमच्या पत्नीला राग येऊ शकतो.

  • नेहमी पॉझिटिव्ह राहा. जेवढं तुम्ही पत्नी सोबत बोलताना राहताना किंवा वागताना पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमचं नातं अधिक मजबूत राहिल. तुमची पत्नीही राग सोडून नेहमी पॉझिटिव्ह राहिल.

  • अनेकदा आपल्याला फक्त बोलायचीच सवय असते. ऐकून घेणे आपल्याला आवडत नाही पण हे चुकीचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पत्नीचा आउट ऑफ कंट्रोल असलेला राग हँडल करायचा आहे तर तिचं ऐकून घ्यावं लागेल.

  • जर पत्नी आपल्यामुळे रागात आहे, हे समजल्यावर तिची आवडती डिश बनवा किंवा लंच किंवा डिनरसाठी तुम्ही तुमच्या हाताने स्वयंपाक करा. तिचा राग झटक्यात निघून जाणार.

  • जर तुमचं नेचर हे गरजेपेक्षा जास्त डॉमिनेटींग असेल तर ते आताच बदला कारण तुमच्या या नेचरमुळेच अनेकदा पत्नीला राग येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT