Amla Halwa esakal
लाइफस्टाइल

Amla Halwa : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खा आवळ्याचा हलवा, सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी आणि शरीर गरम ठेवण्यासाठी उष्ण खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Amla Halwa Recipe : हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी आणि शरीर गरम ठेवण्यासाठी उष्ण खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते.

या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. या भाज्यांपासून आणि फळभाज्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ आणि हलवे बनवले जातात. तुम्ही गाजर, वाटाण्याचा हलवा आतापर्यंत खाल्ला असेल.

मात्र, तुम्ही कधी आवळ्यापासून बनवलेला हलवा कधी खाल्ला आहे का ? हा हलवा खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी हा हलवा आवर्जून खाल्ला जातो. आज आपण आवळ्याचा हलवा कसा बनवायचा आणि त्याची रेसिपी काय आहे? ते जाणून घेऊयात.

आवळ्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • आवळा

  • मीठ

  • गूळ

  • पाणी

  • तिखट

  • आल्याची पेस्ट

  • तूप

  • ड्रायफ्रूट्स

  • तेल

आवळ्याचा हलवा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी आवळा पाण्यात उकळून घ्या. जेणेकरून तो व्यवस्थित शिजेल.

  • त्यानंतर, आवळ्यातील पाणी चाळणीच्या मदतीने गाळून घ्या आणि ३ तासांसाठी आवळा तसाच ठेवा.

  • आता या आवळ्यामध्ये थोडे लाल तिखट (तुम्हाला हवे असल्यास) आल्याची पेस्ट आणि गूळ घाला.

  • आता हे सर्व घटक एकत्रितपणे तेलात भाजून घ्या. जोपर्यंत ते घट्ट जेलीसारखे दिसत नाही, तोपर्यंत ते तेलात सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता या हलव्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात मिक्स ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर, हे मिश्रण तुम्ही पुन्हा तूपात भाजून घ्या, तुमचा आवळ्याचा हलवा तयार आहे.

  • हा हलवा चवीला खूपच सुंदर लागतो. शिवाय, हा हलवा हिवाळ्यात खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT