lemon Iced Tea
lemon Iced Tea sakal
लाइफस्टाइल

वजन कमी करायचं आहे, ट्राय करा लेमन आइस्ड टी, जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

सकाळी उठून दिवसाची सुरुवात एक कप गरम चहा किंवा कॉफीने पिल्याने दिवस उत्साहाने जातो पण अनेकजण उन्हाळ्यात गरम चहा पिण्यास टाळाटाळ करतात.अशात उन्हाळ्यात एक कप आइस्ड टी पिण्याचा आनंद वेगळाच असतो. दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी एक कप लेमन आइस्ड टी प्यायल्याने सर्व थकवा तर दूर होतोच पण डिहायड्रेशनची समस्याही उद्भवत नाही. (How to make lemon iced tea, check here recipe)

लेमन आइस्ड टी रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि याचे सेवन नियमित केल्याने वजन वाढण्याची शक्यता कमी असते. चला तर मग जाणून घेऊया लेमन आईस्ड टीची रेसिपी.

साहित्य -

  • पाणी

  • चहापत्ती

  • चवीनुसार साखर

  • लिंबाचा रस

  • बर्फाचे तुकडे

प्रक्रिया -

  • प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून उकळू द्या.

  • पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यात चहाची पाने टाका.

  • चवीनुसार साखर घालून मिक्स करा.

  • चहापत्ती ४ ते ५ मिनिटे उकळू द्या.

  • नंतर त्यात तीन चमचे लिंबाचा रस घाला.

  • चमच्याने चांगले मिसळा आणि नंतर चाळणीने गाळा.

  • त्यानंतर चहा थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवा.

  • सर्व्ह करण्यापूर्वी, चहा एका ग्लासमध्ये घाला आणि त्यात बर्फाचे तुकडे घाला.

  • तुम्हाला हवे असल्यास वर लिंबाचे तुकडे घालून सर्व्ह करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT