Kissing Tips  google
लाइफस्टाइल

Kissing Tips : पहिलं Kiss गंडलं तर लागेल वाट; असं राहा तयार पहिल्या चुंबनासाठी

पहिला अनुभव चांगला व्हावा यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : प्रत्येक गोष्ट माणूस कधी ना कधी पहिल्यांदाच करत असतो. पहिल्या वेळचा अनुभव चांगला असेल तर तो पुन्हा-पुन्हा ती गोष्ट करत राहातो.

चुंबन घेण्याचंही असंच आहे. पहिल्यांदा किस करताना मनात थोडी धाकधूक असते. अशा वेळी काही चुका घडल्यास तुमचा पहिल्या किसचा अनुभव वाईट असू शकतो. कदाचित मग तो अनुभव घेण्याची संधी तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नाही.

पहिला अनुभव चांगला व्हावा यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

  • तुमचे ओठ कोरडे किंवा फाटलेले नाहीत ना याची खात्री करून घ्या. यासाठी नियमितपणे लिपबाम वापरा.

  • प्री-किस टच-अपसाठी लिप बाम हातात ठेवा.

  • तोंडाला वास येऊ नये म्हणून किस करण्याआधी दात घासून घ्या. माऊथ फ्रेशनरही वापरू शकता.

  • जोडीदाराची तयारी आहे का याची माहिती घ्या. दोघांच्याही संमतीशिवाय किस करण्याची घाई करू नका.

  • सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य केल्यास अडचण होऊ शकते. त्यापेक्षा एकांत मिळेल अशी जागा शोधा.

  • आधी जोडीदाराच्या जवळ जाऊन नजरेला नजर द्या आणि त्याची तयारी असल्याबद्दल थेट विचारणा करा. तुमच्यातला संवाद तुम्हाला आणखी जवळ आणेल.

  • आधी कपाळावर, गालांवर चुंबन घ्या जेणेकरून दोघांचीही मानसिक तयारी होईल.

  • पहिल्याच वेळी फार ताकद लावून किंवा खूप वेळासाठी किस करणे टाळा. तुमचे ओठ जोडीदाराच्या ओठांवर हलकेच टेकवा.

  • एकाएकी पूर्ण किस करण्यापेक्षा थोडे थांबून पुन्हा किस करा.

  • हे करत असताना जोडीदाराला आणि तुम्हालाही आनंद मिळत आहे का याचे निरीक्षण करा.

  • बराच वेळ उभं राहण्याची तयारी नसेल तर दोघांसाठी सोयीची जागा आणि स्थिती निवडा.

  • पहिल्या किसचे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढायचा असेल तर दोघांची संमती आवश्यक आहे. जोडीदाराची संमती नसल्यास तसे करू नका.

  • किस करून झाल्यानंतर मारलेली एखादी मिठी तुमचा अनुभव पूर्णत्वास नेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT