पावसाळ्यात हेडफोन्सची सुरक्षा Esakal
लाइफस्टाइल

पावसाळ्यात Headphones-Earbuds खराब होण्याची चिंता कशाला करायची, हे जुगाड येतील कामी

आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे पावसातही तुमचे इयरबड्स किंवा हेडफोन्स अगदी सुरक्षित राहतील

Kirti Wadkar

Tech Care : पावसाळ्यात घराबाहेर पडताना कायमच अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच पावसाळ्यात Monsoon पावसामुळे तुमच्या कपड्यांसोबत, पुस्तकं किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स Electronic Gadgets पावसामुळे भिजणार तर नाहीत ना याची मोठी चिंता असते. यासाठी संपूर्ण तयारीनेच घराबाहेर पडावं लागतं. (How to Protect your headphones and earbuds in monsoon)

खास करून लॅपटॉप Laptop, मोबाईल, पावर बँक, कॅमेरा किंवा इयरपॉड्स Ear pods अशा वस्तूंची पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी. लागते. यातील जवळपास सर्वच वस्तू तुम्ही योग्य प्रकारे वॉटरप्रूफ बँगमध्ये Waterproof Bags घेऊ शकता. मात्र इयरबड्स Earbuds किंवा हेडफोन अनेकदा फोनवर बोलण्यासाठी आपण कानात घालून घराबाहेर पडतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही देखील इयरबड्स किंवा हेडफोन घालून घराबाहेर पडता आणि तुम्हालाही हेडफोन्सवर पाणी पडून ते बिघडण्याची चिंता सतावत असेल तर काळजी करू नका. कारण असे काही जुगाड आहेत ज्यामुळे तुमचे हेडफोन किंवा इयरबड्स पाणी पडलं तरी सेफ राहू शकता.

आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे पावसातही तुमचे इयरबड्स किंवा हेडफोन्स अगदी सुरक्षित राहतील.

पावसाळ्यात इयरबड्स वापरायचे आहेत...

सर्वप्रथम आवश्यकता नसल्यास पाऊस पडू लागल्यावर तुम्ही हेडफोन किंवा इयरबड्स काढून बॅगमध्ये ठेवा.

पावसाच्या पाण्यापासून इयरबड्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सिलिकॉन कव्हर खरेदी करू शकता. ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये इयरबड्ससाठी विविध प्रकारचे सिलिकॉन कव्हर उपलब्ध आहेत. फक्त ते खरेदी करताना ते किती फॅन्सी आहेत याएवजी ते कित्ती उत्तम प्रतिचे आहेत हे पहा.

हेडफोन किंवा इयरबड्स ठेवण्यासाठी एक वॉटरप्रफू केस खरेदी करा. शिवाय इयरबड्स किंवा इयरपॉड्स खरेदी करताना त्याचं आयपी रेटिंग नक्की तपासा.

हे देखिल वाचा-

जर तुम्हाला पावसाळ्यात गाणी ऐकत चालण्याचा आनंद लुटायचा असेल तर अशा वेळी तुम्ही हुड असलेलं म्हणजेच टोपी असलेलं जॅकेट घालू शकता. यामुळे तुम्ही पावसातही गाणी ऐकण्याची मजा लूटू शकता.

जर तुम्ही हेडफोन वापरत असाल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या सिलिकॉन स्प्रिंगच्या मदतीने संपूर्ण हेडफोनची वायर कव्हर करू शकता. यामुळे देखील तुमचे हेडफोन सुरक्षित राहतील.

हेडफोन किंवा इयरबड्स भिजल्यास घ्या अशी काळजी

  • पावसाळ्यात इयरबड्स भिजल्यास ते लगेचच कोरड्या कापडाने पुसा.

  • ओले झालेले इयरबड्स किंवा हेडफोन कोरडे केल्याशिवाय वापरू नका तसचं चार्जही करू नका.

  • तुम्ही काही सिलिका पॅकेटसच्या मदतीने हेडफोन्स किंवा इयरबड्स पुर्णपणे कोरडे करू शकता.

  • यासाठी एका बॉक्समध्ये किंवा पॅकेटमध्ये सिलिका जेलची पाकीटं ठेवून त्यात हेडफोन्स किंवा इयरबड्स काही तासांसाठी ठेवून द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nakul Bhoir Case: नकुल भोईर हत्या प्रकरणाला वेगळं वळण, एकटीने पतीला कसं संपवलं? भावाने वहिनीविरोधात दिली तक्रार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

Pune News: पुण्याला सोडतो म्हणत पहाटे ३ वाजता लिफ्ट दिली; वाटेतच झुडपात नेत अत्याचार, आरोपीला अटक

Action Under MCOCA : इचलकरंजीतील ‘एसएन गॅंग’च्या सहा जणांवर मोकाखाली कारवाई

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT