how to tell children of your age about sex education esakal
लाइफस्टाइल

Sex Education : वयात आलेल्या मुलांना लैंगिक शिक्षणाबद्दल कसे समजवाल?

लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक संबंधांबद्दल बोलणं असा अनेकांचा समज असतो, पण तसं नाहीयेय.

सकाळ डिजिटल टीम

लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक संबंधांबद्दल बोलणं असा अनेकांचा समज असतो, पण तसं नाहीयेय.

लैंगिक शिक्षण (Sex Education) हा एक असा विषय आहे, ज्याबद्दल बरेच लोक अजूनही मनमोकळेपणाने बोलायला खूप विचार करतात. पण आता अशी वेळ आली आहे की, मुलांना योग्य वयात लैंगिक शिक्षणबद्दल पालकांनी (Parents) काही गोष्टींबद्दल समजावून आणि पटवून सांगितले पाहिजे. याबाबत डॉ. रश्मी बोळे 'सकाळ'शी बोलताना म्हणाल्या की, आजकालच्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल खूप कुतूहल असतं आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारायलाही ते घाबरत नाहीत.

मुलांसाठी लैंगिक शिक्षण का महत्त्वाचे आहे?

लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक संबंधांबद्दल बोलणं असा अनेकांचा समज असतो, पण तसं नाहीयेय. लैंगिक शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपण वाढत्या मुलांना लैंगिक संबंधांबद्दल माहिती देतो, जेणेकरून त्यांना लैंगिक क्रिया, जवळचे संबंध आणि त्यांची लैंगिक ओळख याबद्दल काही गोष्टीं समजतील. ही क्रिया आपल्याला मुलांमध्ये समजूतदारपणा निर्माण करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे त्यांना लैंगिक संबंधातील निर्णय घेण्यास सक्षम केले जाते.

तुमच्या मुलांशी लैंगिक संबंधाबद्दल कसे बोलता?

अनेक पालकांना असं वाटतं की लैंगिक शिक्षण ही एक वेळची चर्चा आहे, ज्यात त्यांना फक्त आपल्या मुलांना शारीरिक संबंध आणि तारुण्याबद्दल सांगावं लागतं, पण तसं अजिबात नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे सतत कृती म्हणून पाहतो आणि काही क्षणांमध्ये त्यावर चर्चा करताय, तेव्हा लैंगिक शिक्षण देण्याची प्रक्रिया सोपी होते.

मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा-

तारुण्याचा काळ मुलांसाठी खूप रोमांचक असतो. ते बऱ्याच शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जातात, ज्यामुळे त्यांना या गोष्टींचा सामना करणे कठीण होते. एक पालक म्हणून, तारुण्याच्या वेळी आपल्या मुलाच्या भावना समजून घेणे आणि त्यांचे सांत्वन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. या सर्व गोष्टींविषयी बोलणे वाईट समजले जाते, परंतु त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मुलांना यासंबंधित काहीच प्रश्न पडणार नाहीत.

मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करा-

आजच्या लहान मुलांना अनेक प्रश्न पडतात, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा वेळी तुम्ही दिलेली कंपनी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तुमच्या मुलास खात्री करुन द्या की तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात आणि त्यांना त्यांच्या समस्या आपल्याबरोबर शेअर करण्यास प्रोत्साहित करा. अशा प्रकारे तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकाल.

यावेळी डॉ. रश्मी बोळे म्हणाल्या, लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातूनही मिळायला हवेत. किशोरवयीन मुलांना किशोर वयात होणारे बदल आणि जागरुकता याविषयी माहिती दिली पाहिजे.लैंगिक शिक्षणामध्ये मुलांना शरीरासंबंधित ओळख करुन द्यावी, आणि लैंगिक अंगाबद्दल समजेल, अशा सोप्या भाषेत माहिती द्यावी. मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यांतील फरक देखील सांगावा आणि तो कसा ओळखावा हे सुद्धा स्पष्ट करावे. मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळाले नाही तर आपल्या पद्धतीने ते स्वत: माहिती मिळवतात. असे स्वत:हून गोष्टी जाणून घेणे चुकीचे ठरु शकते. याचा मुलाच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतो. जेव्हा मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळते तेव्हा त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन त्या गोष्टींकडे ते आर्थिक विचारपूर्वत पाहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT