Easy Hacks
Easy Hacks esakal
लाइफस्टाइल

कपडे धुतल्यानंतर तुम्हीही डिटर्जंटचं पाणी फेकून देता? या टिप्सने पाणी अन् पैशांची होईल बचत

साक्षी राऊत

Daily Life Hacks : कपड्यांवर साचलेली धूळ साफ करायची असेल तर डिटर्जंटपेक्षा वेगळा पर्याय कदाचितच कोणी वापरत असेल. म्हणूनच सामान्यतः प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी याचा वापर केला जातो. कपड्यातून निघालेली घाण डिटर्जंटच्या पाण्यात स्पष्ट दिसून येते. बरेच जण कपडे धुवून झाले की त्याचे पाणी नाल्यात किंवा खरच्या चेंबरमध्ये सोडून देतात. मात्र आज तुम्हाला आम्ही या पाण्याचे असे काही उपयोग सांगणार आहोत जे वाचून तुम्ही यानंतर कधीच डिटर्जंटचं पाणी फेकणार नाहीत.

डिटर्जंटशिवाय कपड्यांची घाण साफ करणे खूप कठीण आहे. म्हणूनच सामान्यतः प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी याचा वापर केला जातो. कपड्याची घाण त्याच्या द्रावणात स्पष्टपणे दिसून येते. अशा स्थितीत तो कचरा समजून नाल्यात फेकणे ही सामान्य बाब आहे. तुम्हीही असेच करता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर हा लेख वाचल्यानंतर तुम्ही ते पुन्हा करण्याआधी नक्कीच दोनदा विचार कराल.

जरी कपडे धुतल्यानंतर डिटर्जंटचे पाणी काळे झाले तरीही त्यात मळ साफ करणारे घटक असतात. जेणेकरून ते पुन्हा वापरता येईल. या ट्रिकचा वापर करून तुम्ही पाणी आणि पैसे दोघांचीही बचत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया, कपडे धुतल्यानंतर उरलेले सर्फचे पाणी पुन्हा कसे वापरता येईल. जाणून घ्या डिटर्जंटच्या पाण्याचा रियूज कसा करायचा ते.

बाथरूममधील घाण साफ करण्यासाठी

बाथरुमच्या टाइल्सवर पाणी आणि धुळीमुळे खूप घाण जमा होते. जर टाइल्स पांढऱ्या असतील तर त्या काही वेळातच पिवळ्या होऊ लागतात. ते साफ करण्यासाठी एक शक्तिशाली क्लिनर आवश्यक आहे. अशा वेळी, कपडे धुतल्यानंतर उरलेले सर्फ बाथरूम टॉयलेट साफ करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

यासाठी हे डिटर्जंट टाइल्सवर लावा आणि ब्रशने घासून घ्या आणि सर्व घाण एका मिनिटात निघून जाईल.

तुमचे शूज चमकवा

शूज स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला साबण आणि डिटर्जंटवर वेगळा खर्च करण्याची गरज नाही. कपडे धुतल्यानंतर उरलेल्या डिटर्जंट पाण्यानेही तुम्ही ते स्वच्छ करू शकता. पण लक्षात ठेवा शूज पांढरा असेल तर ते जास्त वेळ घाणेरड्या पाण्यात भिजवू नका. यामुळे शूजवर डाग पडू शकतात.

तुम्ही या पाण्याने पेस्टिसाइडही बनवू शकता

आजूबाजूला झाडे-झुडुपे असल्यास लहान किडे, किटक घरात शिरण्याचा धोका असतो. यासोबतच ते बागेतील झाडांनाही नुकसाम पहोचवतात. अशा वेळी तुम्ही उर्वरित सर्फ पाण्यापासून घरगुती कीटकनाशक स्प्रे तयार करू शकता. (Clothes)

यासाठी एका मोठ्या भांड्यात डिटर्जंट वेस्ट सोल्यूशन घ्या, नंतर त्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाका आणि चांगले मिसळा. आता ते स्प्रे बाटलीत भरून दर तिसऱ्या दिवशी बागेत फवारावे.

या पाण्याने तुम्ही फरशीही धुवू शकता

कपडे धुतल्यानंतर, तुम्ही फरशी धुण्यासाठी उर्वरित सर्फ सोल्यूशन वापरू शकता. तथापि, जर फरशी खडबडीत असेल तरच हे करणे योग्य आहे. कारण टाइल्सची फरशी असेल तर त्यावरून पाय घसरण्याचा धोका जास्त असतो. (Lifestyle)

उन्हाळ्यात तुम्ही उरलेले सर्फ पाणी संध्याकाळी छतावर टाकू शकता, यामुळे छत स्वच्छ होईल आणि घरही थंड होईल.

टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी सोल्यूशन म्हणूनही वापर करू शकता

टॉयलेट सीट पॉलिश करण्यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात स्वतंत्र सोल्यूशन वापरले जाते. पण ते थोडे महाग आहे, त्यामुळे जास्त वेळा वापरल्याने तुमचा खर्च वाढू शकतो. अशा वेळी, उरलेले डिटर्जंट वापरणे पैसे वाचवण्याचा आणि टॉयलेट सीट चमकण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT