Milk for Skincare Sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : ऊन कितीही तीव्र असूदे; घरातल्या या पदार्थामुळे त्वचेला काही होणार नाही!

यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज नाही. घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

वैष्णवी कारंजकर

ऊन, धूळ, प्रदूषण, केमिकल्सयुक्त कॉस्मेटिक्स यामुळे त्वचा बरीच खराब होते. ही त्वचा स्वच्छ करण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थही तुम्ही वापरू शकता. जेणेकरून त्वचेची झालेली हानी भरून निघेल आणि त्वचेचा तजेला परत येईल. यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज नाही. घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

त्वचेसाठी सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजे दूध. व्हिटमिन ए, डी आणि लॅक्टिक अॅसिड या उपयुक्त गोष्टी दूधामध्ये असतात. त्यामुळे चेहऱ्याला चमक येते. जाणून घ्या त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी दूधाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो...

दूधाने चेहरा धुण्याचे फायदे

दुधाने चेहरा धुतल्याने त्वचेवरची घाण, मृत त्वचा निघून जाते. दुधातल्या लॅक्टिक अॅसिडमुळे चेहऱ्यावरचा तेलकटपणाही दूर होतो. चेहरा धुण्यासाठी एका वाटीमध्ये ताजं दूध घ्या आणि हाताने ते चेहऱ्यावर शिंपडा व चेहरा धुवून घ्या. या आधी फेसवॉश किंवा पाण्याने एकदा चेहरा साफ करून घ्या. यानंतर चेहरा मऊ कापडाने पुसून घ्या. एवढ्या दुधाने चेहरा धुण्याऐवजी तुम्ही कापसाने चेहऱ्याची मालिश करू शकता किंवा चेहरा दूधाने पुसून घेऊ शकता. (SkinCare Tips)

सुरकुत्या येत नाहीत

दूधामध्ये एंटी एजिंग तत्व असतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल, तर तुम्ही दूधाचा वापर सुरू करू शकता. दूधामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात, तसंच त्वचा मऊ आणि सतेज होते.

एक्सफोलिएशन

त्वचेची रंध्रे मोकळी करण्यासाठीही दूधाचा वापर केला जाऊ शकतो. दूधाने चेहरा आणि चेहऱ्याची त्वचा, रंध्रं मोकळी होतात, त्यातली घाण निघून जाते आणि चेहरा स्वच्छ होतो.

उन्हामुळे होणारी हानी रोखते

सध्या उन्हाने त्वचेची काहिली होत आहे. उन्हामुळे होणाऱ्या हानीपासून त्वचेला वाचवायचं असेल तर दूधाचा वापर करावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. उन्हाने त्वचा काळवंडते. त्यावर उपाय म्हणूनही दूधाचा वापर करता येईल.

कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT