Ajrakh Print Outfits  esakal
लाइफस्टाइल

Ajrakh Print Outfits : अजरख प्रिंटच्या आऊटफीट्सचा वॉर्डरोबमध्ये समावेश करायचा आहे? मग, अशा पद्धतीने करा स्टाईल

जर तुम्ही देखील अजरख प्रिंटच्या आऊटफीट्सला वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करणार असाल तर, त्यासाठीच्या खास स्टायलिंग टिप्स जाणून घ्या.

Monika Lonkar –Kumbhar

Ajrakh Print Outfits : राजस्थानातील बाडमेर या जिल्ह्यातील खत्री समाजाने अजरख प्रिंटची सुरूवात केली होती. ही प्रिंट आज एवढी प्रसिद्ध झाली आहे की, या अजरख प्रिंटच्या साड्या, विविध प्रकारचे आऊटफीट्स, बेडशीट्स, कुशन कव्हर्स आणि दुप्पटे आता मार्केटमध्ये आले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्टने अजरख प्रिंटच्या साडीमध्ये सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. तिच्या या साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.

एवढच नव्हे तर या साडीतले तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर, या अजरख प्रिंटच्या साड्यांना आणि आऊटफीट्सला महिलांची मागणी वाढली आहे. जर तुम्ही देखील अजरख प्रिंटच्या आऊटफीट्सला वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करणार असाल तर, त्यासाठीच्या खास स्टायलिंग टिप्स जाणून घेणार आहोत.

विविध प्रकारचे आऊटफिट्स करा ट्राय

अजरख प्रिंटमध्ये आजकाल अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ अजरख प्रिंटच्या विविध प्रकारच्या साड्यांनी तुमचा वॉर्डरोब भरू नका. यासोबतच विविध प्रकारच्या अजरख प्रिंटमधील ड्रेसेसचा, स्कर्ट्सचा किंवा स्कार्फचा ही तुम्ही समावेश करू शकता.

योग्यप्रकारे लेअरिंग करा

या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही अजरख प्रिंटचा आऊटफीट परिधान करणार असाल तर, याचे लेअरिंग योग्य प्रकारे करणे फार महत्वाचे आहे. या आऊटफीटसोबत तुम्ही डार्क कलरचे जॅकेट्स, कार्डिगन्स आणि शाल देखील कॅरी करू शकता. यामुळे, तुमचे शरीर ऊबदार राहण्यासोबतच तुमच्या लूकला चारचाँद लागतील, यात काही शंका नाही.

ऑफिससाठी असे करा स्टाईल

अजरख प्रिंटची साडी किंवा विविध प्रकारचे आऊटफीट्स तुम्ही कोणत्याही प्रसंगी स्टाईल करू शकता. ऑफिसमध्ये फॉर्मल लूकसाठी देखील तुम्ही अजरख प्रिंटची साडी परिधान करू शकता. यासोबतच, अजरख प्रिंटचा ड्रेस, बॉटम्स आणि दुपट्टे देखील उपलब्ध आहेत.

तुमच्या सोयीनुसार तुम्ही या आऊटफीट्सची निवड करू शकता. ऑफिसमधील फॉर्मल लूकसाठी अजरख प्रिंटचे आऊटफीट्स किंवा साडी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT