laptop sakal
लाइफस्टाइल

Laptop Tips and Tricks: या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर लवकरच खराब होईल नवीन लॅपटॉप, अशी घ्या काळजी

लॅपटॉप वापरताना कोणत्या चुका करू नयेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Aishwarya Musale

जर अचानक लॅपटॉप खराब झाला तर लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. बहुतेक वापरकर्ते अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांचा लॅपटॉप लवकर खराब होतो. लॅपटॉप वापरताना कोणत्या चुका करू नयेत ते आम्हाला तुम्हाला सांगतो.

1. लॅपटॉप वुडन टेबलवर ठेवून वापरा

अनेकदा लोक लॅपटॉप टेबलवर ठेवण्याऐवजी बेडवर ठेवून वापरण्यास सुरुवात करतात. जर तुम्ही एक्झॉस्ट टेबल किंवा प्लॅटफॉर्म खरेदी करत नसाल तर तुम्ही लाकडी टेबल वापरावे. वुडन टेबलवर लॅपटॉपची हिट व्यवस्थित पास होऊन जाते आणि हवेचा प्रवाह देखील राहतो, ज्यामुळे लॅपटॉपच्या आत उष्णता थांबत नाही आणि लॅपटॉप चांगले काम करत राहते.

जेव्हा लॅपटॉप जास्त गरम होतो, तेव्हा तो बॅटरीवरही खूप ताण देतो. हे जास्त काळ केले तर बॅटरीची क्षमता कमी होऊन ती पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागते. इतकेच नाही तर लॅपटॉपची बॅटरी काही महिन्यांत खराब होऊ लागते, जी बदलण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागतात.

2. लॅपटॉप लोकल चार्जरने चार्ज करू नका

लॅपटॉप चार्ज करण्यासाठी तुम्ही लोकल चार्जरचा वापर कधीही करू नये कारण लोकल चार्जर काही काळ व्यवस्थित चार्ज होतो, पण त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी खराब होऊ शकते.

लॅपटॉपची बॅटरी योग्य ठेवण्यासाठी, तुम्ही नेहमी ओरिजिनल चार्जर वापरावा जेणेकरून लॅपटॉपची बॅटरी योग्य प्रकारे काम करेल. याशिवाय, लॅपटॉप चार्ज करताना कधीही काम करू नये कारण यामुळे लॅपटॉपची बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते.

3. या कारणांमुळे लॅपटॉप प्रोसेसर खराब होऊ शकतो

लॅपटॉप वापरत असताना, तुम्ही एकाच वेळी अनेक टॅब उघडू नयेत कारण त्यामुळे प्रोसेसरवर दबाव वाढतो. प्रोसेसरवर जास्त दबाव आल्यास लॅपटॉप लवकर खराब होतो. याशिवाय गेमिंग किंवा व्हिडीओ एडिटिंगसाठी ज्या लॅपटॉप्सचा प्रोसेसर या कामांसाठी तयार केला आहे ते तुम्ही वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT