Indian Women  esakal
लाइफस्टाइल

Stress Management : जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली कोमेजतायेत महिला, अभ्यासातून समोर

एका अहवालानुसार भारतीय महिला आणि मातांना नेमका तणाव का येतो यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Stress in Women : घरच्या स्त्रीच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. ती कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. आपल्या देशातील चित्र भीतीदायक आहे. एका अहवालानुसार भारतीय महिला आणि मातांना नेमका तणाव का येतो यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. अहवालात सांगितल्यानुसार 82 टक्के महिलांना स्वत:ला द्यायला निवांत क्षण नाहीत. तर, 87 टक्के महिलांनी बहुतांश वेळा तणावाचा सामना केला आहे. त्यात भारतीय महिला कोमजल्या आहेत.

काय आहेत महिलांच्या तणावाची कारणं?

सासरी तडजोड करणं

कोणत्याही मुलीचं आयुष्य लग्नानंतर 360 अंशानं बदलतं. एका नव्या कुटुंबासोबत ताळमेळ साधतांना महिलांची कसोटी पाहिली जाते. अहवालानुसार 25 ते 45 महिला या परिस्थितीचा सामना करतात.

नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी

कुटुंब आणि नोकरीमध्ये समतोल साधण्यासाठीसुद्धा महिलांवर प्रचंड दडपण येतं. अनेकदा त्यांचे पाय जबाबदाऱ्यांच्या बेडीत अडकतात, तर अनेकदा नोकरी डोळ्यासमोर उभी ठाकते.

बाळासाठीचं दडपण

लग्नानंतर महिलांवर आणखी एका गोष्टीचा दबाव. किंबहुना दडपण असतं. ते म्हणजे बाळाचा जन्म. बाळाची प्लानिंग कधी, घाई करा, लग्नाला किती वर्षे झाली आता मुल पाहिजे.. या अशा अपेक्षांचं महिलांना प्रचंड दडपण येतं. पुढे बाळाच्या जन्मानंतर एका नव्या पर्वाला अनुभवतानाही त्यांची दमछाक होते. मुलांच्या संगोपनावरूनही त्यांच्यावर अनेकदा टीकेची झोड उठते. यामुळं त्यांचं प्रचंड मानसिक खच्चीकरण होतं.

घरात काय पदार्थ बनणार, सण- उत्सव कसे पार पडणार, मुलांचं भवितव्य काय असणार इथपासून पैशांची जुळवाजुळव, पतीचा आनंद आणि अशा असंख्य गोष्टी महिलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या डोक्यात सातत्यानं सुरु असतात. ज्यामुळं दर दिवशी, क्षणोक्षणी नाही म्हटलं तरी त्या तणावाखाली असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: कामाची बातमी! बकरी ईदमुळे 27 मे की 28 मे? महाराष्ट्रातील बँका नेमक्या कधी बंद राहणार?

Gold Price: सोन्यात ७००, तर चांदीत तब्बल सहा हजारांची घसरण; सराफ बाजारात मोठी उलथापालथ

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

SCROLL FOR NEXT