Mount Everest esakal
लाइफस्टाइल

International Mountain Day : जगातील सर्वात उंच पर्वत माहिती आहेत?

सकाळ डिजिटल टीम

आज 11 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (International Mountain Day) म्हणून साजरा केला जातो.

आज 11 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (International Mountain Day) म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशाची भौगोलिक रचना बघता भारतात हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरावली अशा अनेक जुन्या-नव्या पर्वत रांगा आहेत. जगातलं सगळ्यात उंच ठिकाण कुठलं असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही हिमालय म्हणालं; पण जगातलं सगळ्यात उंच पर्वत भारताच्या आसपासच आहेत. अनेकदा आपण हे विसरतो की, भारत हा भौगोलिक दृष्ट्या जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात भिन्न प्रदेश आहे. जगातील सर्वात पर्वत रांग देखील भारतामध्येच आहेत. चला तर, मग जाणून घेऊया जगातील उंच पर्वतांबाबत..

माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) : नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असणाऱ्या या सर्वोच्च पर्वतशिखराची नवी उंची पूर्वीपेक्षा 86 सेंटीमीटर्स जास्त आहे. पूर्वीच्या मोजदादीनुसार ही उंची 8,848 मीटर होती. या उंचीमध्ये शिखरावरचं बर्फाच्छादित टोकही (Snow Cap) मोजण्यात आलंय. पर्वतावरच्या बर्फाच्छादित टोकाची उंची मोजण्याच्या पद्धतीवरून चीन आणि नेपाळचं एकमत होत नव्हतं. सर्व्हे ऑफ इंडियानं ठरवलेली एव्हरेस्टची उंची ही जगभर प्रमाण म्हणून स्वीकारली जात होती. पण, त्या उंचीपेक्षा एव्हरेस्टची उंची 4 मीटरनं कमी असल्याचं चीनचं आतापर्यंत म्हणणं होतं. माऊंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा तर तिबेटमध्ये चोमोलुंग्मा म्हटलं जातं.

कंचनजंघा (Kanchenjunga) 2 : भारताशेजारील पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच पर्वत आहे. के 2 या नावानं ओळखले जाणारं हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे. याची व्याप्तीही खूपच मोठी आहे.

कंचनजंघा (Kanchenjunga) : हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माऊंट एव्हरेस्ट व के 2 यांच्यानंतरचं तिसरं सर्वात उंच शिखर आहे. भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची 8,586 मीटर (28,169फूट) इतकी आहे. याचं खरं स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असं आहे, तर किरन्त धर्मात सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असं समजलं जातं.

ल्होत्से (Lhotse Mountain) : ल्होत्से (नेपाळी) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माऊंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मीटर (27,940 फूट) आहे. जवळची शिखरे अनुक्रमे ल्होत्से मध्य (पूर्व) 8,414 मीटर (27,605 फूट) व ल्होत्से शार 8,383 मीटर (27,503 फूट) उंच आहेत. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे. या ‘साउथ कोल’ची उंची देखील 8 हजार मीटरहून अधिक आहे. 1956 साली फ्रित्झ लुशिगर व अर्न्‍स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केलीय.

मकालू (Makalu Mountain) : माउंट एव्हरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची 8463 मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेलं आहे. 15 मे इ.स. 1955 रोजी लिओनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. 2014 साली ‘गिरीप्रेमी’च्या संघानं या शिखरावर यशस्वी चढाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT