Womens's Day Wishes 2024 esakal
लाइफस्टाइल

Womens's Day Wishes 2024 : 'तिच्या' प्रतिभेला आणि कर्तृत्वाला करा सलाम! जागतिक महिला दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा

Womens's Day Wishes 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महिलांशिवाय, हे जग अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Womens's Day Wishes 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महिलांशिवाय, हे जग अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत आहेत.

महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्व समाजापर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी जगभरात ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचे महत्व सांगणारा आजचा हा विशेष दिवस.

आजच्या या महिला दिनानिमित्त तुम्ही तुमची आई, बहिण, बायको, मैत्रिण, प्रेयसी या सगळ्यांना शुभेच्छा पाठवू शकता. त्यांच्या आयुष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका.

तुम्ही पाठवलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छांमुळे त्यांना निश्चितच आनंद होईल. आज आम्ही तुम्हाला खास महिला दिनानिमित्त शुभेच्छा पाठविण्यासाठी काही खास संदेश आणि निवडक चारोळ्या घेऊन आलो आहोत. (Womens's Day Wishes)

१. स्त्री म्हणजे वास्तव्य,

स्त्री म्हणजे मांगल्य

स्त्री म्हणजे मातृत्व

स्त्री म्हणजे कर्तृत्व

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!

२. अशी कोणतीच गोष्ट नाही, जी महिला करू शकत नाही.

त्यामुळेच, सर्व आघाड्यांवर महिला आज पुढे आहेत आणि नेहमी राहतील

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!

३. उत्तुंग तुझ्या भरारीपुढे हे गगन ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे

जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

४. आईच्या वात्सल्याला सलाम

बहिणीच्या प्रेमाला सलाम

मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम

पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

५. ती आहे म्हणून हे विश्व आहे

ती आहे म्हणून घराला घरपण आहे

ती आहे म्हणून नात्यांमध्ये जिवंतपणा आहे

तिचा सन्मान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!

६. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर

आपली भूमिका योग्य पद्धतीने

साकारणाऱ्या माझ्या आई

बहिण, पत्नी, मैत्रिण आणि लेकीस

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!

७. विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर स्वत:च्या अस्तित्वाचा तू

जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Force Fighter Jet Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले, पायलटसह सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीही परदेशातून परतले

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Inspiring Story:'वयाच्या साठीत ५० हजार किलोमीटर सायकल प्रवास'; चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवृत्तीनंतर जोपासला छंद

SCROLL FOR NEXT