लाइफस्टाइल

Investment Tips :  ताई माई आक्का तुम्हाला माहिती असायलाच हव्यात पतीच्या या गोष्टी, आर्थिक घडी बसवणं सोप्पं जाईल

पतीकडे साडी घेण्यासाठी हट्ट करू नका मात्र मृत्यूपत्र बनवण्यासाठी नक्की करा, कारण...

सकाळ डिजिटल टीम

Investment Tips :  

आजकाल सर्वच महिला सगळी कामे करू लागल्या आहेत. अगदी अग्निशमन सारख्या क्षेत्रात असो वा एखादं बँक अकाऊंट हाताळणं असो. सगळं काही एकदम सोप्प झालं आहे. महिलांनी त्यांची व्याप्ती वाढवली आहे. पण समाजात अशा अनेक महिला आहेत ज्यांना बँक, गुंतवणूक यांचा गंधही नसतो.

यात या महिलांची काही चूक नाही. कारण,या गृहिणी नेहमी त्यांच्या पतीवर अवलंबून असतात. प्रत्येक कामाच्या बाबतीत त्या जोडीदारावर विसंबून असतात. ज्यामुळे बँक, कागदपत्र यांची माहिती या महिलांना नसते. तेव्हा आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती घेणार आहोत ज्या महिलांना माहिती असायलाच हव्यात.

पतीची गुंतवणूक कुठे कुठे आहे?

तुमच्या पतीचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये भला मोठा आकडा मागितला तर काय करायचं. अशावेळी पाहुणे, जोडलेली माणसं मदतीला येतात. पण पत्नी म्हणून स्व:तही पतीचे सेव्हिंग्ज, गुंतवणूक यांची माहिती घ्या. काही बॅंकमधील ठेवी, सोन्यातील गुंतवणूक असेल तर ते पैसे कसे काढायचे, पतीचे अकाऊंट सांभाळणारा अकाऊंटंट यांचे नंबर घेऊन ठेवा.

नॉमिनी नाव कोणाचं आहे?

अचानक ओढावलेला तो कोरोना संकटाचा काळ होता. अन् कोरोना काळात  कोरोना काळात अनेक लोकांचे मृत्यू झाले होते. तेव्हा काही पुरूषांच्या पत्नींना पतीचे सेव्हिंग्ज, त्यांचे बॅंक अकाऊंट डिटेल्स याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा पतीचे शेवटचे दर्शनही मिळाले नाही तेव्हा आपले म्हणणारे लोकही जवळ नव्हते.

कोरोना काळात अनेक महिलांना यातून जावं लागलं आहे. त्यामुळे जोवर जोडीदार जिवंत आहे सोबत आहे तोवरच त्याने केलेल्या सेव्हिंग्जची माहिती आणि नॉमिनीला तुमचं नाव आहे का हे पाहण गरजेचच आहे

आरोग्य विमा

भलेही तुम्ही एक गृहिणी असाल. तुम्ही काही कमवत नसाल पण घर तुम्ही सांभाळत आहात. त्यामुळे घरातील कर्त्या पुरूषांनंतर घर सांभाळण्याची तुमची जबाबदारी आहे. तसेच आजारपण कधीही सांगून येत नाही. त्यामुळे पतीनंतर तुमच्या आजारपणाचे ओझे मुलांवर पडू नये त्यामुळे आरोग्य विमा काढून घ्यावा.

पतीचे मृत्यूपत्र आहे का?

एखाद्या घरात वडिलांचे निधन झाले अन् दोन मुलांची लग्नही झाली असली. तर वडिल गेल्यानंतर लगेचच घरोघरी प्रॉपर्टीमुळे वाद भांडणं होत असतात. त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास गेलेल्या पुरूषाच्या पत्नीला होतो. कारण पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा पहिला हक्क असतो.

प्रॉपर्टी मिळवण्यासाठी सख्ख्या आईला वेठीस धरले जाते. तिला मारहाणही केली जाते. तुम्हाला अशा सगळ्यात अडकायचे नसेल तर जोवर जोडीदार जिवंत आहे तोवर महिलांनी मागे लागून मृत्यूपत्र बनवण्यासाठी हट्ट केला पाहिजे.

बचत गटांची होईल मदत

बँक, गुंतवणूक, मृत्यूपत्र, गुंतवणुकीचे अनेक मार्ग या बद्दल माहिती मिळवण्यासाठी बचत गट हा चांगला पर्याय आहे. कारण आजकाल गावोगावी बचत गट पोहोचला आहे. बचत गटाची सुरूवातच बँकेत महिलेच्या नावाचे खाते काढून होते. त्यामुळे बँकेत जाणे, व्यवहार करणे महिलांना शिकावं लागत आहे. बँकेत गेल्यानेच तिथल्या अनेक गोष्टींचे ज्ञान महिलांना होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT