Janmashtami 2024 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2024 : श्री कृष्णांची द्वारका पाण्यात कशी बुडाली ? उत्खननात नक्की काय-काय सापडलं?

Dwarka Nagri Story:मथुरेतून द्वारकेत हे स्थलांतर कोणा एका कुटुंबाचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. तर संपूर्ण नगरीच उचलून न्यावी लागली आहे. तिथे गेल्यानंतर संपूर्ण नगरी श्रीकृष्णांना वसवावी लागली.

सकाळ डिजिटल टीम

Dwarka Nagri Story:

श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाल्यानंतर त्याचं बालपण गोकुळ-वृंदावनात गेलं. त्यानंतर क्रम लागतो तो द्वारकेचा. एकदम उत्तरेतून पश्चिम दिशेला सागरकिनारी यावं लागलं त्याचं कारण म्हणजे सुरक्षितता. जरासंधाच्या सतरा आक्रमणांनंतर खिळखिळ्या झालेल्या यादव सेनेला शांती मिळण्यासाठी हा कठोर निर्णय श्रीकृष्णांना घ्यावा लागला आहे.

मथुरेतून द्वारकेत हे स्थलांतर कोणा एका कुटुंबाचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. तर संपूर्ण नगरीच उचलून न्यावी लागली आहे. तिथे गेल्यानंतर संपूर्ण नगरी श्रीकृष्णांना वसवावी लागली. (Janmashtami 2024 )

पण ही द्वारका सध्या समुद्रात आहे. द्वारकेचा राजा कान्हा असं म्हटलं जातं. पण, जेव्हा श्री कृष्णकाळ संपला तेव्हा द्वारका नगरीही समुद्रात बुडाली आणि तिचे अवशेष अरबी समुद्रात आजही आहेत, असे म्हणतात.

इ.स.पूर्व १०० मध्ये हरिमंदिराचा पूर्वभाग बांधला गेला असे इकडच्या एका ब्राह्मी भाषेतील शिलालेखात लिहिलेले आहे. त्यानंतर ३०० वर्षांनी मूळ खत्रीखाली श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्यात आली. इ.स. ८०० मध्ये आद्य शंकराचार्यांनी द्वारका मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरात आदिशक्तीची स्थापना केली.

असे म्हणतात की या शहराला अनेक दरवाजे होते म्हणून या शहराला द्वारका असे नाव पडले. १९६० मध्ये आजच्या द्वारका शहरात घर पाडताना मंदिराचे प्रमुख गाय सापडले होते. येथे उत्खननादरम्यान भगवान विष्णूच्या मंदिराच्या अवशेषांसह अनेक वस्तू सापडल्या.

१९६३ साली गुजरात सरकारने पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील थोर संशोधक डॉ. ह.धों. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर इथे उत्खनन केले. डॉ. सांकलियांच्या प्रतिपादनाप्रमाणे इ.स. ८०० ते ९५० पर्यंत द्वारकेतील श्रीका मंदिर उभे होते.

पुढे ते पडू लागले. इ.स. ११२० मध्ये मीलनदेवींनी या मंदिराचा मोणोद्धार केला. इ.स. ११५२ मध्ये उदयपूरचा राजा भीमसिंह याने परत मंदिराचं डागडुजी करून मंदिराच्या खर्चासाठी ७००० बिघे जमीन दिली.

१९८९ मध्ये पाण्याखालील उत्खननादरम्यान मोठे आयताकृती दगड सापडले. चंद्रकोर आकाराचे दगडही येथे सापडले. हे सर्व दगड मानवाने कोरले होते. यासह पाण्यात भिंतींचे अवशेष सापडले. त्यात मोठ्या प्रमाणात चुनखडी आढळून आली. काहीतरी बनवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असावा असे वाटले.

एवढेच नाही तर येथे मातीची भांडी आणि नाणीही सापडली. २०२७ मध्ये खोल समुद्राचा शोध लागला. समुद्राच्या खोलातही दगडी वस्तू सापडल्या आहेत. एका पुरातत्वशास्त्रज्ञाने सांगितले की समुद्राच्या आत सापडलेल्या गोष्टी सुमारे २००० ईसापूर्व आहे.

इ.स. ११५६ चा सुमारास भक्त बोडाणाने या मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती डाकोरला नेली. डॉ. सांकलिया यांच्या संशोधनाप्रमाणे द्वारकेत इ.स.पूर्वीपासून समुद्रानजीकच्या खडकावर लोकांची वस्ती होती. सागराच्या आक्रमणाने ती द्वारका बुडाली. तेथील इमारतींवर वीस फूट म्हणजे सात मीटरपर्यंत वाळूचा थर चढला.

या थरावर पुन्हा लोकवस्ती झाली. त्या लोकांचा ग्रीकांशी संबंध आला. ग्रीक लोक जहाजामार्गे इथे येऊनही गेले होते. त्या काळातील ग्रीसमधील मद्याचे प्याले (चषक) व इतर भांडी येथील उत्खननात सापडली आहेत. ही द्वारकाही कालांतराने नष्ट झाली. काही तज्ज्ञांच्या मताप्रमाणे दुसऱ्या तिसऱ्या शतकातील द्वारका सुमारे दोनशे वर्षांपर्यंत टिकली होती व पुढे ती पाचव्या शतकाच्या आसपास समुद्रात बुडाली असावी.

त्यानंतर पुन्हा सहासातव्या शतकात वसवली गेली असावी. डॉ. सांकलियांच्या मताप्रमाणे आठव्या शतकात पुन्हा त्याच जागेवर तिसरी द्वारका उभी राहिलेली आहे.

(संबंधित माहिती सौ.गीता आदिनाथ हरवंदे यांच्या श्री कृष्ण स्थलयात्रा या पूस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT