Kids Sleep Timing  
लाइफस्टाइल

पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

अभ्यासासाठी, संशोधकांनी 1,600 पेक्षा जास्त पालकांचा अभ्यास केला

सकाळ डिजिटल टीम

मुलांची झोप हा पालकांसमोर खूप मोठा प्रश्न असतो. मुलांना दामटवून झोपवल्याशिवाय ती झोपतच नाहीत. अनेक मुलं तर झोपताना मोबाइल बघत झोपतात. त्यामुळे सकाळी उशिरा उठतात. कोरोना काळात मुलांच्या झोपेचं (Sleep) गणित आणखी बिघडलं आहे. पण ते काहीही असंल तरी मुलांच्या (Children) झोपेची निश्चित वेळ ठरवणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी रात्री दिलेल्या वेळी मुलांनी झोपण्यासाठी पालकांनी (Parents) त्यांना शिस्त लावणं गरजेचं आहे.

sleep

लहान मुलांनी झोपण्यासाठी पालकांनी केलेले विविध प्रयत्न आणि त्यामुळे होणारे परिणाम याविषयी बीएमसी पब्लिक हेल्थने अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार. जे पालक त्यांच्या मुलांनी झोपावे यासाठी नियम करून त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करतात त्या मुलांना पुरेशी झोप मिळण्यास मदत होऊ शकते, असे पाहायाला मिळाले. कमी झोप मिळाल्यास मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यांना लक्ष देण्यात अडचणी, सामाजिक संवाद साधण्यास समस्या, चिडचिडेपणा आणि झोपेच्या कमतरतेमुळे काहीवेळा नैराश्य येऊ शकते.

असा केला अभ्यास

अभ्यासासाठी, संशोधकांनी 1,600 पेक्षा जास्त पालकांचा अभ्यास केला. पण, किमान एक मूल 18 वर्षांखाली असावे असे पाहिले. त्या मुलांच्या डेटाचा वापर यावेळी केला गेला. त्यावेळी 94 टक्के पालकांनी आपल्या मुलाला एका विशिष्ट वेळी झोपायला प्रोत्साहन दिले. तर, 84टक्के पेक्षा जास्त पालकांनी मुलांच्या झोपेच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केल्याचे नोंदवले. ज्या पालकांनी नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केल्याचा अहवाल दिला त्यांच्या मुलाला झोपेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यात ५९ टक्के अधिक मदत झाली, असे संशोधकांनी नमूद केले. तसेच ज्या पालकांनी मुलांना विशिष्ट वेळी झोपायला प्रोत्साहन दिले, त्या मुलांच्यात झोपेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता कमी केल्याचे आढळले.

kids Sleep

अभ्यासातील निष्कर्ष - अभ्यासात 5 ते 9 वर्षे वयोगटातील मुले वेळेत झोपताना आढळली. पण, 10 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण कमी होते. 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये सोमवार ते शुक्रवार या दरम्यान आणि शनिवार - रविवारच्या झोपेमध्ये 38.3% टक्क्यांनी फरक दिसला.

मुलांना पुरेशी झोप मिळाल्याने होणारे फायदे - पुरेशी झोप मिळाल्याने अनेक चांगल्या गोष्टी करायला मुलांना शक्ती मिळते. ती सक्रीय राहतात. तसेच त्यांची पुरेशी वाढ होण्यास, हृदयाचे कार्य चांगले होण्यास आणि एकूणच शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

मुलांच्या झोपण्याची मार्गदर्शक तत्त्वे

नॅशनल स्लीप फाऊंडेशन (NSF) च्या मते, 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज रात्री किमान 10 ते 13 तास झोपले पाहिजे. तर 6 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांनी किमान 9 ते 11 तास झोपले पाहिजे. 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांनी 8 ते 10 तास झोपणे गरजेचे आहे. असते. NSF नुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी, 7 ते 9 तास झोपणे चांगले मानले जाते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT