Kitchen Hacks In Marathi  Sakal
लाइफस्टाइल

कुकरच्या शिटीतून तांदूळ-डाळीचे पाणी बाहेर येते का? समस्येवर जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

Kitchen Hacks In Marathi : कुकरमध्ये डाळ किंवा तांदूळ शिजवताना शिटी अथवा झाकणातून पाणी बाहेर पडते का? यामुळे स्टोव्ह किंवा शेगडी पूर्णपणे घाण होते. पण ही समस्येपासून आपण सहजरित्या मुक्तता मिळवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Hacks In Marathi : मॉडर्न लाइफस्टाइलनुसार घराघरामध्ये प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लोक तांदूळ, डाळींपासून ते कित्येक भाज्याही प्रेशर कुकरमध्येच शिजवतात. यामुळे गॅसची बचत होण्यासह स्वयंपाक देखील झटपट तयार होतो. 

पण कित्येकदा कुकर वापरताना काही समस्यांचाही सामना करावा लागतो. कधी कुकरची शिटी वाजत नाही, कधी शिटी किंवा झाकणातून पाणी-अन्न बाहेर येते, तर कधी अन्न अतिप्रमाणात शिजते अथवा शिजतच नाही. या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.  

कुकरचा असा करा वापर, शिटीतून बाहेर येणार नाही पाणी 

कुकरमध्ये योग्य प्रमाणात पाणी ठेवा   

स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरमध्ये जास्त प्रमाणात पाणी ओतले आणि गॅस मोठ्या आचेवर ठेवल्यास प्रेशरमुळे शिटी वाजल्यास त्यासह पाणी बाहेर येऊ लागते. म्हणून कुकरमध्ये नेहमीच योग्य प्रमाणात पाणी ठेवावे.

गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा

तांदूळ आणि डाळ शिजवण्यासाठी कुकर नेहमी मंद आचेवर ठेवावे. गॅसची आच मोठी ठेवल्यास कुकरमधील पाणी शिटीतून बाहेर येईल.  

कुकरची शिटी स्वच्छ ठेवावी 

कुकरच्या शिटीमध्ये घाण जमा झाली असेल तर कुकरची शिटी वाजत नाही आणि जेव्हा शिटी वाजते तेव्हा यासह पाणी देखील बाहेर फेकले जाते. ही समस्या टाळण्यासाठी प्रेशर कुकरची शिटी नियमित स्वरुपात स्वच्छ करावी. 

कुकरचा रबर तपासून पाहावा

काही जण एका कुकरचा रबर दुसऱ्या कुकरसाठी देखील वापरतो. कुकरचा रबर कधी जुना तर कधी खराब देखील झालेला असतो. अशा परिस्थितीतही कुकरमधील पाणी बाहेर फेकले जाते. म्हणूनच रबर वापरण्यापूर्वी तपासून घ्यावा.

कुकरचे झाकण खराब होणे 

जर कुकर जुना झाला असेल किंवा त्याचे झाकण पडून-आपटून खराब झाले असेल तर कुकरमधून गळती होऊ लागते. या कारणामुळेही कुकरमधील पाणी बाहेर फेकले जाते. असे आढळल्यास लगेचच कस्टमर केअरशी संपर्क साधून कुकरचे झाकण बदलावे किंवा नवीन कुकर विकत घ्यावा. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT