Kitchen Hacks
Kitchen Hacks esakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: भांडी धुवायला घेतली अन् पाणीच संपलंय? या गोष्टी वापरून धुवाल तर भांडी नव्यासारखी चकाकतील!

Pooja Karande-Kadam

Kitchen Hacks: घरात जेवण बनवण्याचा कंटाळा येतो, कारण नंतर भांड्यांचा ढिग कोण साफ करणार हा मोठा प्रश्न असतो. जेवण, नाश्ता केला की भांडी घाण होतात. काही लोकांकडे त्यावर मशीन आणि कामवाल्या मावशी आहेत. पण या दोन्ही गोष्टी खर्चिक आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच जमेल असं नाही.

घाणेरडी भांडी जास्त वेळ स्वच्छ न केल्यास दुर्गंधीसोबतच बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. यामुळेच बहुतेक लोकांना जेवल्यानंतर लगेच भांडी साफ करणे आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे भांडी धुवायला लागणारे पाणी. काही ठिकाणी पाण्याची इतकी टंचाई आहे की लोक पत्रावळीत जेवण करतात.  

आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पाण्याशिवाय किंवा कमी पाण्यातही भांडी चमकवू शकता. (How to wash utensils without soap)

तुम्ही कधीही पाण्याशिवाय भांडी धुतली आहेत का? आम्ही तुम्हाला सांगतो की असे करणे खूप सोपे आणि शक्य आहे. आपण सांगितलेल्या या घरगुती उपायांचा अवलंब करून भांडी पाण्याशिवाय स्वच्छ करता येतात.

या युक्तीने भांड्यातील वंगण आणि वास देखील दूर केला जाऊ शकतो. विशेषत: जे लोक कामासाठी नोकर ठेऊ शकत नाहीत. या युक्त्या जाणून घेतल्याने ते पाण्याशिवायही भांडी धुवू शकतात.

रात्री भांडी रिकामी ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊन घरातील आशीर्वाद थांबू शकतात. घरामध्ये घाण भांडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. अन्न खाल्ल्यानंतर लगेच भांडी धुवावीत आणि दूर ठेवावीत असाही शास्त्रात उल्लेख आहे. (Kitchen Hacks)

राख वापरा

तुम्ह खरकट्या भांड्यात राख टाकून चोळून भांडे स्वच्छ करू शकता. यासाठी खरकट्या साबण न टाकता केवळ  भांड्यात राख टाका अन् चोथ्याने घासा. यानंतर सगळी घाण निघून जाईल अन् शेवटी टिश्यू पेपरने भांडे पुसून घ्या.

लाकडाचा भूसा

तुम्ही राखेऐवजी लाकडाचा भूसा देखील वापरू शकता. लाकडाच्या भुसाने खरकट्या भांड्याला स्वच्छ करता येतं. त्यामुळे राखेची प्रोसेस पुन्हा इथे रिपिट करा. भुसा टाकून तुम्ही चोथ्याने घासा. नंतर कापड किंवा टिश्यू पेपरने ते पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे भांडी स्वच्छ होतील.

बेकिंग सोडा

बर्‍याच वेळा भांडी जळतात किंवा त्यात इतकी घाण साचते की ती साबणानेही साफ करता येत नाही. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी प्रथम भांडी थोड्या गरम पाण्यात भिजवावीत. नंतर त्यावर बेकिंग सोडा शिंपडा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. त्यानंतर तुम्ही स्पंजच्या मदतीने भांडी घासून स्वच्छ करा.

व्हिनेगर वापरा

पाण्याशिवाय भांडी धुण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. सर्व प्रथम, टिश्यू पेपरने घाण भांडी स्वच्छ करा. नंतर त्यावर नीट व्हिनेगर स्प्रे करा. आता भांडी 5-10 मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर प्रत्येक भाग पुन्हा टिश्यू पेपरने स्वच्छ करा. असे केल्याने तुमची भांडी तर स्वच्छ होतीलच पण त्यांचा वासही नाहीसा होईल. ही एक अतिशय सोपी पद्धत आहे, जी तुम्ही फॉलो करू शकता. (Vinegar )

खरकटी भांडी जास्तवेळ ठेऊ नयेत असा वास्तूशास्त्राचा नियम आहे

लिंबू

लिंबाचा वापर पाण्याशिवाय भांडी स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम घाणेरडी भांडी टिश्यू पेपरने स्वच्छ करा. नंतर भांडीनुसार २-३ चमचे खाण्याचा सोडा घ्या, त्यात २-३ लिंबू पिळून घ्या. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि स्पंजच्या मदतीने भांड्यांवर नीट लावा आणि थोडा वेळ ठेवा. सुमारे 5 मिनिटांनंतर, टिश्यू पेपर किंवा कापडाच्या मदतीने भांडी पूर्णपणे पुसून टाका.

बेकिंग सोडा, लिंबू

घाणेरडी भांडी स्वच्छ करण्यासाठी 1-2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबू पिळून घ्या. जर जास्त भांडी असतील तर सोडा आणि लिंबू यांचे प्रमाण वाढवा. आपण त्यात थोडे व्हिनेगर देखील घालू शकता.

या तिन्ही गोष्टी एकत्र करून मिश्रण तयार करा आणि ते भांड्यांवर पूर्णपणे लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर टिश्यू पेपरच्या मदतीने भांडी नीट पुसून घ्या. याने भांडी चमकदार होतील आणि लिंबाचा अप्रतिम सुगंध भांड्यांना येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT