Milk
Milk esakal
लाइफस्टाइल

दूध कसे उकळायचे? हो याच्याही असतात खास टिप्स

सकाऴ वृत्तसेवा

महिला अनेकदा दूध उकळण्याच्या हॅक्सविषयी माहिती शोधत असतात. जर तुम्हालाही बऱ्याचदा या समस्येचा सामना करावा लागत असेल तर या हॅक्सबद्दल जाणून घ्या.

दूध गरम करणे ही प्रत्येकाची सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकजण या समस्येने त्रस्त आहे. तुमच्या बाबतीतही असे घडतेय का, जोपर्यंत तुम्ही दुधाकडे पाहात आहात तोपर्यंत ते बाहेर पडणार नाही, पण तुम्ही काही कामात बिझी होताच दूध बाहेर सांडू लागते. दुध खाली पडताना यापेक्षा गॅस साफ करण्यात जास्त त्रास होतो. महिला अनेकदा दूध उकळण्याच्या हॅक्सविषयी माहिती शोधत असतात. जर तुम्हालाही बऱ्याचदा या समस्येचा सामना करावा लागत असेल तर या हॅक्सबद्दल जाणून घ्या.

- दूध उकळत असताना त्यात एक चमचा ठेवा. असे केल्याने दूध भांड्यातून बाहेर पडण्यापासून रोखता येते. याचे कारण असे की दुध उकळताना खूप दाब येतो आणि जेव्हा त्यात चमचा टाकला जातो तेव्हा दुधाला जास्त दाब येण्यापूर्वी वाफेला बाहेर पडण्याची जागा मिळते.

- कधीही दुध उकळवाल तेव्हा पातेल्यास तूप किंवा लोणी लावा. तुप लावल्याने भांड्यातून दूध बाहेर येत नाही. अशा स्थितीत तुमचे लक्ष दुधापासून जरी हटवले तरी ते पडत नाही.

- दुध उकळत असताना, भांड्यावर एक लाकडी स्पॅटुला ठेवा किंवा बेलन देखील ठेवू शकता. असे केल्याने पातेल्यातून दूध बाहेर येणार नाही.

- दुधात पाणी शिंपडल्याने दुधाचे उकळणेही कमी होते आणि दूध उकळल्यानंतर भांड्यातून बाहेर पडत नाही.

- याशिवाय, ज्या भांड्यात दूध उकळले जात आहे त्यात थोडे पाणी घाला आणि वरून दूध ओता आणि ते उकळण्यासाठी ठेवा.

लक्ष द्या.

दुधाला मध्यम ते मंद आचेवर उकळवा आणि दुधाच्या भांड्याचा आकार त्याच्या प्रमाणापेक्षा थोडा मोठा ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT